कोकण

मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील परमोच्च क्षण

CD

10104
दोडामार्ग ः आरोग्य शिबिराच्या उद्‍घाटन प्रसंगी डॉ. वर्षा पाटील व अन्य.

मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील परमोच्च क्षण

डॉ. वर्षा पाटील; दोडामार्गमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

दोडामार्ग, ता. १८ : मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील परमोच्च क्षण आहे. त्यासाठी प. पू. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या पुढाकारातून सिद्धगिरी हॉस्पिटलने पुढाकार घेतला, हे कौतुकास्पद आहे. ज्यावेळी मातेच्या हाती सुदृढ बाळ येईल, तेव्हा सर्वांना आनंद वाटेल. मातृत्व सुखासाठी मातांना जे सहकार्य हवे निश्चितच देऊ, अशी ग्वाही सिद्धगिरी जननी आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालक आणि विभागप्रमुख डॉ. वर्षा पाटील यांनी केले.
तालुक्यातील काडसिद्धेश्वर सांप्रदाय यांच्यावतीने आणि लोकनेते सुरेश दळवी यांच्या सहयोगातून येथील विलास हॉल येथे मोफत तपासणी शिबिर नुकतेच झाले. यावेळी डॉ. पाटील यांच्या समवेत गुरुबंधू एकनाथ गवस, लक्ष्मण कानडे, नारायण गवस, प्रदीप गवस, राकेश धरणे, पत्रकार तुळशीदास नाईक, तेजस देसाई, शंकर जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील यांनी आपण विदेशात शिक्षण घेऊन या भागात महिलांसाठी हे कार्य करण्यासाठी प. पू. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या आशिर्वादाने आल्याचे सांगितले. केवळ तपासणीपुरते न राहता प्रत्येक अडचणीत सोबत असेन, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित महिलांना दिली. संजय गवस यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ गवस यांनी प्रास्ताविक केले. तेजस देसाई यांनी आभार मानले. शिबिराचा लाभ ९५ हुन अधिक जोडप्यांनी घेतला. सिद्धगिरी हॉस्पिटलच्या स्टाफने सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badrinath Kedarnath Entry Ban : बद्रीनाथ,केदारनाथ सह 'या' ४८ मंदिरांतही गैर हिंदूना प्रवेश बंदीची तयारी, कशामुळे घेतला निर्णय ?

Astrology Money : 1 फेब्रुवारी! माघ पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धि योगसह अनेक शुभ योग; 2026 मध्ये धनलाभ हवा असेल तर नक्की करा 'हे' एक काम

Beed News : पोलिसच विनाहेल्मेट! सक्ती केवळ पहिल्या दिवशीच; रस्ता सुरक्षा अभियानाचा अधिकाऱ्यांना पडला विसर

Latest Marathi news Update : नाशिक ते मुंबई आदिवासी शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचा आजचा दुसरा दिवस

March Astrology 2026: 30 वर्षांनी मोठा ग्रहयोग! मार्चमध्ये शनि–सूर्य एकत्र, ‘या’ 3 राशींना होणार जबरदस्त आर्थिक फायदा

SCROLL FOR NEXT