कोकण

भेसळयुक्त पदार्थांचे सेवन हानिकारक

CD

10122
ओरोस ः येथे ‘अन्न सुरक्षा’ विषयावर संतोष शिरोशिया यांनी मार्गदर्शन केले.


भेसळयुक्त पदार्थांचे सेवन हानिकारक

संतोष शिरोशिया; ओरोस येथे ‘अन्न सुरक्षा’बाबत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ ः दैनंदिन जीवनात आपण अनेक भेसळयुक्त पदार्थ वापरतो. रोजच्या जीवनातील सर्व प्रकारच्या भाज्या रासायनिक खतांवर वाढवल्या जातात. तांदूळ, गहू, अन्य कडधान्यांवरही खतांचा भरपूर वापर होतो. चायनीज पदार्थ व त्यामध्ये वापरले जाणारे अनेक पदार्थ शरीरास हानिकारक आहेत, तरीही लोक चवीसाठी हे पदार्थ खातात. अन्न सुरक्षित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन अन्न सुरक्षा अधिकारी संतोष शिरोशिया यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ‘अन्न सुरक्षा’ या विषयावर ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी अध्यक्ष सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सहायक लोक अभिरक्षक श्वेता तेंडोलकर, मुख्याध्यापक अशोक रायबान व सहकारी शिक्षक उदय सावंत उपस्थित होते.
शिरोशिया म्हणाले, ‘‘बाहेर टपरीवरील वडापाव, तळलेले पदार्थ व बंद पॅकेटमध्ये मिळणारे अन्य पदार्थ हे देखील भेसळयुक्त असतात. त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. खाद्य पदार्थांच्या पॅकेटवर अन्न व औषध प्रशासनाची विविध चिन्हे असतात. बाजारामध्ये विक्रीसाठी व अधिक नफा मिळविण्यासाठी भेसळयुक्त किंवा कमी दर्जा असलेले अन्न पदार्थ विक्रीस आणले जातात. तेव्हा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एफएसएसआय’, ‘आयएसआय’ यांसारख्या संस्था राष्ट्रीय स्तरावर स्थापन केल्या आहेत.’’ दरम्यान, कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
--
अन्य मान्यवरांची मनोगते
सहायक लोक अभिरक्षक तेंडोलकर यांनी अन्न भेसळयुक्त नसल्यानेच जुनी माणसे अनेक वर्षे जगत होती; मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार अन्नपदार्थ भेसळयुक्त झाल्याने माणसाला अनेक आजार उद्‌भवत असून त्यामुळे जीवनमानही कमी होत चालले आहे, असे सांगितले. या कार्यक्रमासमवेत मुलांचे अधिकार याविषयी जनजागृती व साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या विषयावर तेंडोलकर यांनी कायदेविषयक माहिती दिली. सर्व मुले भारताचे पुढचे भविष्य आहेत. शालेय वयातच त्यांना कायद्यांची माहिती पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुलांच्या विविध कायद्यांची माहिती देखील दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

Health Insurance Updated Rules: आता फक्त २ तास ॲडमिट होऊनही क्लेम करता येणार हेल्थ इन्शुरन्स! जाणून घ्या योजना

Sindhudurg : सोनाली गावडे मृत्यू प्रकरण, ‘ती’ दुसरी छत्री कोणाची? बांदा पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

Eknath Shinde Delhi Visit : पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंचं दिल्ली वारी, अमित शहांसह वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट, नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT