कोकण

रत्नागिरी- जिल्ह्यात हजार मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

CD

- rat६p१७.jpg- रत्नागिरी ः स्वसंरक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करताना जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी. सोबत सीमा हेगशेट्ये, डॉ. आशा जगदाळे आदी.

जिल्ह्यात हजार मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

नवनिर्माण संस्थेत प्रारंभ ; कार्यशाळा ८ जुलैपर्यंत

रत्नागिरी, ता. ६ ः मुली, महिलांवर होणारे हल्ले, अत्याचार पाहता त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत, याकरिता राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील हजार मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. त्याची प्रशिक्षण कार्यशाळा येथील नवनिर्माण शिक्षणसंस्थेत सुरू झाली. याचे उद्घाटन आज झाले असून उद्यापासून (ता. ७) स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत.
नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये म्हणाले, ‘माणसाच्या हातात धारदार शस्त्र असण्यापेक्षा मन धारदार विचारांनी मजबूत असायला हवं. संपूर्ण जग लिंगभेद मानत नसताना मुली असुरक्षित असणं, हे दुर्दैव आहे. सोळाव्या शतकात महिलांच्या सुरक्षित जीवनाचे धडे राजमाता जिजाऊंच्या तालमीत छत्रपती शिवरायांनी गिरवले. त्याचा परिणाम असा झाला, शिवरायांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्याचे हातपाय कलम केले. अशी शिक्षा दिल्याने महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस त्या वेळी कुणाचे झाले नाही. शिवरायांनी घालून दिला आहे. हाच वारसा जपायला हवा. तो वारसा जपताना महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर आणि तत्काळ शासन व्हायला हवे.
ही कार्यशाळा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, महिला व बालविकास विभागाचे आर. बी. काटकर, सायबरसेलचे नितीन पुरळकर, नजमा मुजावर, भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या समुपदेशक जान्हवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुशील साळवी यांनी केले. प्रा. पूर्णिमा सरदेसाई यांनी आभार मानले.


कोट

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केला पाहीजे. मुलींनी आपली माहिती सामाजिक उघड करणे धोकादायक आहे. आई-वडील हेच आपले पहिले मित्र आहेत. त्यांनाच विश्वासात घेऊन अत्याचाराविषयक गोष्टी सांगायला हव्यात. त्याचवेळी पोलिस हेल्पलाईन ११२ या क्रमांकावर संपर्क साधायला हवा, असे केल्यास पोलिस तक्रार केल्यापासून आठ ते दहा मिनिटात तुमच्या मदतीला येतील आणि पोलिस आले नाहीत तर आमच्याकडे तक्रार करा. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT