कोकण

संक्षिप्त

CD

पान ५ साठी

गुरू म्हणजे संस्कारपीठ ः कानडे
चिपळूण ः मानवाच्या आयुष्यात सुसंस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. अशा सुसंस्कारातून आयुष्याला सुंदर आकार देण्याचे काम गुरू करत असतात. त्यामुळे गुरू हे संस्कारपीठ आहे, असे मत मुकुंद कानडे यांनी मांडले. डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मुकुंद कानडे बोलत होते. गुरूंमध्ये शिष्याचे जीवन प्रभावी करण्याची क्षमता असते. खरा गुरू हा अध्यापनासोबतच आचरणातून शिष्यामध्ये मूल्यांची रूजवणूक करतो, असे नमूद करत त्यांनी भारतीय संस्कृतीमधील ज्ञानदेव-निवृत्तीनाथ, स्वामी विवेकानंद-रामकृष्ण परमहंस अशा थोर गुरू-शिष्यांची उदाहरणे दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका स्नेहल कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. विठ्ठल कोकणी, सल्लागार प्रा. स्वप्नील साडविलकर आदी उपस्थित होते.


कळकवणे शाळेत शालेय वस्तूंचे वाटप
चिपळूण ः तालुक्यातील कळकवणे शाळा नं. १ मध्ये शालेय व्यवस्थापन समितीतर्फे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी समितीच्या अध्यक्षा आरोही शिंदे, उपाध्यक्ष विकास मोरे, शिक्षणतज्ज्ञ मंगेश कदम, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन सदस्य महेश शिंदे, वैष्णवी शिंदे, नम्रता खरात, मुख्याध्यापिका खेडकर, पदवीधर शिक्षक दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

‘डीबीजे’त सीए आणि जीएसटी डे
चिपळूण ः नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयात कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स फोरमकडून सीए आणि जीएसटी डे साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात सीए विवेक रेळेकर आणि प्रतीक रेडीज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी, सातत्य, अभ्यासाचे नियोजन आणि आंतरप्रेरणा या गुणांचा पाया मजबूत असेल तर सीए होणं सहजशक्य आहे, असे रेळेकर यांनी सांगितले. रेडीज यांनी जीएसटीविषयी तोंडओळख होईल, असं संवादात्मक सत्र विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमांच्या आयोजनासाठी न. ए. सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तळप, पर्यवेक्षिका कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले. कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स फोरमचे समन्वयक प्रा. पालशेतकर व प्रा. खर्चे, सभासद प्रा. निपाणी, प्रा. विनायक बांद्रे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.


१५२१५
खेर्डी महाविद्यालयात पालक-शिक्षक सभा
चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या ज्युनियर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती महाविद्यालयात अकरावी व बारावीची पालक-शिक्षक सभा झाली. प्रास्ताविक प्रा. सुरेश जगदाळे यांनी केले. त्यांनी एमएचटी, सीईटी, नीट व जेईईची परिपूर्ण माहिती दिली. विज्ञान, वाणिज्य व कला या सर्व शाखांची माहिती सांगून करिअरसंदर्भात मार्गदर्शन केले. प्राध्यापक राजेंद्र पवार यांनी पालक-शिक्षक संघाची निवड करत शालेय शिस्तीबाबत माहिती सांगितली. उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी वर्षामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षा तसेच सर्व दाखल्यांसंदर्भात माहिती दिली. प्राचार्य संजय वरेकर यांनी मार्गदर्शन केले. सभेला ५०० पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT