कोकण

खेडमध्ये सदस्य शिवसेनेत

CD

३२ (पान २ साठी, संक्षिप्त)

खेडमध्ये उपसरपंचांसह सदस्य शिवसेनेत

खेड ः तळवट खेड, तळवट जावळी उपसरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी शिवसेना नेते, माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये उपसरपंच समीर सकपाळ, सदस्य लक्ष्मीकांत पालांडे, मंगेश पालांडे, नयना पालांडे, निला पालांडे, रागिणी तांबे, मयुरी लाडे यांच्यासह ग्रामस्थांचा समावेश आहे. या वेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, अरविंद चव्हाण, अरुण कदम, भास्कर पालांडे, योगेश आंब्रे, संदीप आंब्रे, शांताराम म्हसकर आदी उपस्थित होते.
----

खेड लायन्स क्लब ऑफ सिटीचा पदग्रहण सोहळा

खेड ः लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी रोहन विचारे तर सचिवपदी सुरेश चिकणे यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शहरातील मराठा भवन येथील केशवराव भोसले सभागृहात पार पडला. या वेळी इतरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या वेळी लायन्स क्लबचे राजेंद्र कांसवा, डॉ. विरेंद्र चिखले, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, उद्योजक मनोहर जैन, वसंत उदेग, दीपक घोसाळकर, माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, माजी नगरसेवक संजय मोदी, उद्योजक पारस जैन, माजी अध्यक्ष डॉ. विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
----

लायन्स क्लबतर्फे शालेय साहित्य वाटप

खेड ः लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्यावतीने अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी भांड, सदानंद भोसले, ज्ञानदीप शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, सुयश पाष्टे, विरेंद्र चिखले, यांच्या हस्ते या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. या वेळी सुरेश चिकणे यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाला पंकज शहा, माजी अध्यक्ष विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष बाबू चिखले, निनाद गांधी, अनिल मोरे, आदित्य चिखले आदी उपस्थित होते.
--

चोरवणे रस्त्यासाठी सव्वादोन कोटी मंजूर

खेड ः तालुक्यातील चोरवणे जखमीचीवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने, माजी मंत्री रामदास कदम यांच्या शिफारशीने पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वात शिवसेना खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला. येथील रस्त्यासाठी निधी मंजूर व्हावा याकरिता ग्रामस्थांची मागणी होती. ही बाब शिवसेना खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर हा निधी मंजूर झाला आहे. अॅड. प्रवीण शिंदे, सरपंच अश्विनी मेस्त्री, उपसरपंच प्रवीण सावंत, सदस्य सुनील मेस्त्री व ग्रामस्थांनीही चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला.
--

लायन्स क्लबचा आज पदग्रहण सोहळा

गुहागर ः लायन्स क्लबच्या दुसऱ्या वर्षाच्या अध्यक्षपदासाठी संतोष वरंडे, सचिव म्हणून सचिन मुसळे, खजिनदार म्हणून मनिष खरे यांची नियुक्ती बुधवारी (ता. १२) होणार आहे. नव्या कार्यकारिणीच्या शपथविधी आणि पदग्रहण सोहळ्यासाठी इन्टॉलिंग ऑफिसर एम. जे. एफ्. ला. डॉ. विजय रिळकर, रिजन चेअरमन उपस्थित राहणार आहेत. सायं. ७ वा. भंडारी भवनमध्ये हा सोहळा होणार असून सोहळ्यात लायन्स क्लबचे नवे अध्यक्ष संतोष वरंडे, सचिव सचिन मुसळे, खजिनदार मनिष खरे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू, सचिव संतोष वरंडे, खजिनदार सचिन मुसळे आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT