कोकण

सावर्डे व राजेवाडी धरणांना निधी मंजुर करा

CD

फोटो ओळी
-rat१८p३.jpg-KOP२३M१६८९८ मुंबई ः उद्योजक किरण सामंत व उद्योजक सचिन पाकळे यांनी सावर्डे व राजेवाडी धरणाविषयी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा करताना.


सावर्डे व राजेवाडी धरणांना निधी मंजूर करा
जलसंधारण मंत्र्यांना साकडे ; पाकळे व किरण सामंतांनी घेतली भेट
सावर्डे, ता. १८ ः सावर्डे येथील नवीन धरण व डेरवण राजेवाडी धरण दुरुस्तीचे प्रस्ताव सर्व्हेक्षण करून तांत्रिक मंजुरीसाठी शासनाकडे सादर केले आहेत. हे दोन्ही प्रस्ताव मंजूर झाल्यास सावर्डे परिसर टॅंकरमुक्त होईल. ही धरणे होणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे गांभीर्याने लक्ष देऊन दोन्ही प्रस्ताव मंजूर करा, अशी मागणी सावर्डे येथील सुभाष पाकळे ग्रुपचे प्रसिद्ध उद्योजक सचिन पाकळे व राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली.
मंत्री राठोड यांनी जलसंधारण खात्याचा कारभार स्वीकारल्यानंतर पाकळे व सामंत यांनी मुंबईत भेट घेवून अभिनंदन केले. यावेळी बंटी पाटीलही उपस्थित होते. पाकळे यांनी चिपळूण तालुक्यातील धरणांविषयी त्यांना माहिती दिली. सावर्डे येथील धरणासाठी भैरीचं खोरे येथील चव्हाण बंधूनी २५ हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे. या बाबत प्राथमिक सर्व्हेक्षण झाले असून या धरणामुळे ३४०० सहस्त्र घन मीटर पाणी साठा होणार आहे. २१३ हेक्टर जमीन ओलिता खाली येणार असून भूसंपादनासहीत अंदाजे ८४ कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच डेरवण राजेवाडी धरणाच्या मुख्य विमोचकामधून गळती सुरू झाली आहे. तिवरेची पुनरावृत्ती होऊन नये यासाठी जलसंधारण विभागाने त्या धरणाची दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी २०२० -२०२१ ला धरण रिकामे केले. गेले चार वर्षे ते धरण रिकामे आहे. डेरवण-सावर्डे सह कापशी नदी जवळील गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या धरणाच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी लागणार आहेत. याचे अंदाजपत्रक तयार करून तसा प्रस्ताव जलसंधारण विभागाकडे पाठवला असल्याचे पाकळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Dhyaneshwar Katke Accident : बालिकेच्या अपघातात आमदार ज्ञानेश्वर कटकेंची चूक होती का? दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप, काय घडलं नेमकं?

मोठा दावा : "रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याशिवाय टीम इंडिया २०२७ चा वर्ल्ड कप जिंकू शकत नाही!"

Pune: लोणी काळभोरमध्ये स्फोट! महिला गंभीर जखमी, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल

Latest Marathi News Live Update: मेट्रोची कामांमुळे मुंबई प्रदूषणाच्या पातळीत वाढ - मिहिर कोटेचा

Nashik Politics : नाशिकच्या 'दुबई वॉर्ड'मध्ये राजकीय भूकंप! बालेकिल्ला असूनही मविआला उमेदवार मिळेना; कारण...

SCROLL FOR NEXT