कोकण

‘शिक्षणा’तील निष्काम कर्मयोगी अणावकर सर

CD

18985
(कै.) शशिकांत अणावकर

‘शिक्षणा’तील निष्काम कर्मयोगी अणावकर सर

लीड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण सुविधा निर्माण व्हावी, यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या मोजक्या व्यक्तीमत्त्वांमध्ये शशिकांत अणावकर उर्फ अणावकर सर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. पणदूर पंचक्रोशीत दर्जेदार शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली तपश्चर्चा पाहता त्यांच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या कामाची प्रचिती येते. अणावकर सर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे कार्य समजून घेण्याचा हा प्रयत्न...
---------
दररोज या भूतलावर अनेक लोक जन्माला येतात व अनेक मृत्यू पावतात. त्यातील कित्येक कधी जन्माला येतात व कधी सोडून जातात याची दखल समाज तर सोडाच घरातील लोक सुद्धा घेत नाहीत. काही जन्माला आल्यावर संसार नीटनेटका करतात. त्यांची दखल परिवारातील लोक घेतात; परंतु समाजाला त्यांचे काही देणेघेणे नाही. फार कमी लोक असतात की जे आपल्या जीवनात असेकाही काम करतात की आपल्या कार्याने ती समाजामध्ये अजरामर होतात. काळालाही त्यांची नोंद ठेवावी लागते. त्यातीलच एक तपस्वी व्यक्तीमत्व म्हणजे आमचे (कै.) शशिकांत अणावकर उर्फ अणावकर सर.
कवी दत्त हलसगीकर यांची कविता आठवते...
ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
सुर्यकुळाशी ज्यांचे नाते
त्यांनी थोडा उजेड द्यावा
युगायुगांचा अंधार जेथे
पहाटेचा गाव न्यावा
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करुन भरुन घ्यावे
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे
या कवितेचा अर्थ अणावकर सर खऱ्या अर्थाने जगले. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजाला व शिक्षण क्षेत्राला अर्पण केले. मृत्यूनंतर देहही त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान केला. वेताळबांबर्डे येथे तत्कालीन समाजधुरीणांनी वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून श्री देव वेताळ मंदिर येथे माध्यमिक शाळेचे रोपटे लावले होते. सरांनी ते रोपटे वेताळबांबर्डे, पणदूर, अणाव, हुमरमळा, डिगस पंचक्रोशीच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित केले. जेणेकरून पंचक्रोशीतील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देता येईल. सुमारे २३ वर्षे त्यांनी अणावचे सरपंच म्हणून काम पाहिले. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- नागेंद्र परब, माजी जिल्हा परिषद सदस्य, वेताळबांबर्डे, कुडाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अवकाळीच्या ढगानं घात केला, अजितदादांच्या विमानाचा अपघात कमी दृश्यमानतेमुळं, नेमकं काय घडलं?

Blood Pressure Control: फक्त मीठ कमी केल्यानं बीपी कंट्रोल होतो का? डॉक्टरांनी सांगितलेलं धक्कादायक सत्य

Latest Marathi News Live Update : दादा गेले! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अश्रू अनावर

Gold Price Today : अमेरिकन फेडच्या निर्णयापूर्वी सोनं-चांदी चमकले! सोनं ३,२०० रुपयांनी महागलं, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Ajit Pawar Death: महाराष्ट्र सुन्न! विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन, राज्यावर शोककळा

SCROLL FOR NEXT