कोकण

संक्षिप्त

CD

- ratchl204.jpg ः KOP23M24830 चिपळूण ः मालघरमध्ये वृक्षारोपण करताना कृषिदूत.
----------

मालघरमध्ये कृषिदुतांकडून मार्गदर्शन
चिपळूण ः तालुक्यातील मांडकी पालवण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या बळीराजा गटाने मालघर ग्रामपंचायतीला भेट दिली. या वेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या कृषिदुतांचे स्वागत करून त्यांच्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. हे कृषिदूत मालघर येथे शेतलावणीचे प्रात्यक्षिक शेतावर जाऊन करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. लोकांना शेतीविषयक माहिती, पिकाची लागवड यावर मार्गदर्शन करत आहेत. कृषिदुतांनी केंद्र सरकारच्या ''मेरी मिट्टी, मेरा देश'' या उपक्रमामध्ये सहभागी होऊन 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याची शपथ घेतली. या वेळी मालघर सरपंच गावचे सुनील वाजे, उपसरपंच मोरे, ग्रामसेविका संगीता खांबे, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळी
-rat20p24.jpg ः3M24827 चिपळूण ः रोहिदास समाजसेवा संघाच्या बैठकीत गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
------------------

रोहिदास समाजसेवा संघातर्फे सत्कार
चिपळूण ः रोहिदास समाजसेवा संघाने नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले आहे आणि भविष्यातदेखील या उपक्रमांना प्राधान्य देण्याबरोबरच अन्यायाविरोधात आवाज उठवला जाईल, अशी ग्वाही या संस्थेचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांनी रोहिदास भवन येथे आयोजित 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी दिली. या संस्थेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी मागील सभेचे इतिवृत्त व जमाखर्च वाचन व मंजुरी याचबरोबर अन्य विषयांनादेखील मंजुरी देण्यात आली. यानंतर गुणवंत विद्यार्थी तसेच नवराष्ट्र पुरस्कृत समाजभूषण पुरस्कारप्राप्त संस्थेचे उपाध्यक्ष रमेश चिपळूणकर गुरूजी, उत्कृष्ट कार्यक्षेत्रातील नारदखेरकी सरपंच राघो अंबवकर दापोली कृषी विद्यापीठ उच्च पदस्थ अधिकारी डॉ. संतोष सावर्डेकर, लायन्स क्लब सावर्डे नवनियुक्त सेक्रेटरी सतीश सावर्डेकर, शासकीय सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी प्रकाश सावर्डेकर, स्टेट बँक शाखा चिपळूणमधून सेवानिवृत्त झालेले दीपक खेडेकर, आशा सावर्डेकर, अहिल्याबाई होळकर पुरस्कारप्राप्त पूजा कदम यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर, रमेश चिपळूणकर, मंगेश पेढांबकर, सुनील चिपळूणकर, प्रकाश पेढांबकर, रवींद्र काजरोळकर आदी उपस्थित होते.

फोटो ओळी
-rat20p25.jpg ःKOP23M24828 चिपळूण ः तालुका काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले.

राजीव गांधी यांना चिपळूणमध्ये अभिवादन
चिपळूण ः भारताचे माजी पंतप्रधान, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रणेते, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज येथील चिपळूण तालुका काँग्रेसच्यावतीने अभिवादन करण्यात आले. चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात या निमित्ताने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेविका सफा गोठे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश राऊत, सिकंदर नाईकवाडी, जनार्दन पवार, शमून घारे आदी उपस्थित होते.


फोटो ओळी
-rat21p32.jpg ः KOP23M24902 लांजा ः जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मोबाईल छायाचित्र स्पर्धा आणि फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी राजू कुरूप, जयवंत शेट्ये.

मोबाईल छायाचित्र स्पर्धेत दीपक साळुंखे प्रथम
लांजा ः लांजा तालुका फोटोग्राफर संघटनेच्यावतीने आयोजित मोबाईल छायाचित्र स्पर्धेत दीपक साळुंखे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हा कार्यक्रम सांस्कृतिक भवन येथे झाला. जागतिक फोटोग्राफी छायाचित्र दिनाचे औचित्य साधून लांजा तालुका फोटोग्राफर संघटनेच्यावतीने माझा लांजा या विषयावर मोबाईल छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी माजी नगराध्यक्ष सुनील कुरूप, न्यु एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये, उद्योजक विनय बुटाला, कल्पना कॉलेजचे संस्थापक मंगेश चव्हाण, कलाशिक्षक किरण बेर्डे, ज्येष्ठ छायाचित्रकार विलास कोळेकर, विद्यादीप कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव आदी उपस्थित होते. स्पर्धेतील प्रथम विजेते दीपक साळुंखे यांना 1500 रुपये व छायाचित्र, द्वितीय विजेते बंटी गाडे यांना 1 हजार रुपये व छायाचित्र आणि तृतीय विजेते प्रशांत बोगुलवार यांना 500 रुपये व छायाचित्र असे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.


लांजा आगारातून मार्लेश्वरसाठी विशेष गाडी
लांजा ः श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर लांजा एसटी आगारामार्फत प्रत्येक सोमवारी लांजा ते मार्लेश्वर अशी मार्लेश्वर दर्शन विशेष बससेवा सुरू करण्यात आली. आज पहिल्याच सोमवारी या बसफेरीला उदंड प्रतिसाद लाभल्याचे माहिती आगार व्यवस्थापिका काव्या पेडणेकर यांनी दिली. खास श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्रावण महिन्यातील दर सोमवारी लांजा एसटी आगारामार्फत सकाळी 8 वाजता लांजा बसस्थानकातून मारलेश्वर दर्शन विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रवासभाडे केवळ 125 रुपये ठेवण्यात आले आहे. तर महिला सन्मान योजनेंतर्गत 50 टक्के सवलत दिली जाणार असून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के या मोफत प्रवास मिळणार आहे. लांजा, कोर्ले, भांबेडमार्गे मार्लेश्वर अशी ही बसफेरी सोडली जाणार आहे. यासाठी अनिल लांजेकर आणि विद्याधर कुवेस्कर यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

SCROLL FOR NEXT