कोकण

वैभव नाईकांच्या कामांचा भाजपला पोटशूळ

CD

37740
अमरसेन सावंत

वैभव नाईकांच्या कामांचा भाजपला पोटशूळ

सावंत ः द्वेषापोटीच गुन्हा दाखल करण्यासाठी धडपड

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः आमदार वैभव नाईक यांच्या कामाचे पोटशूळ असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची दडपशाही सुरु असल्याची टिका शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी पत्रकातून केली.
श्री. सावंत यांनी पत्रकात म्हटले आहे, की ‘कुडाळ ते मुंबई जाणाऱ्या शयनयान एसटी बस सेवेची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी, त्याची जाहिरात व्हावी, ही सेवा निरंतर सुरु रहावी, एसटीचे उत्पन्न वाढावे, त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, यासाठी आमदार या नात्याने नाईक यांनी शयनयान बस चालविली होती. त्या बसमध्ये प्रवासी बसलेच नव्हते. त्यांनी ही एसटी बस कुडाळ डेपोच्या आवारातच आणि अगदी कमी वेगात चालविली होती. भाजप पदाधिकारी ज्याप्रमाणे टीका करत आहेत ते केवळ आमदार नाईक यांच्या द्वेषापोटी करत आहेत. नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ, मालवणमध्ये होत असलेली विकासकामे आणि जनतेचा त्यांना मिळणारा पाठींबा याचा पोटशूळ भाजप पदाधिकाऱ्यांना असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांची गेले चार दिवस दडपशाही सुरु आहे. आमदार नाईक हे ५० खोक्यांसाठी भाजप आणि शिंदे गटात गेले नाहीत. ईडी, सीबीआय, एसीबी कारवाईला ते घाबरले नाहीत. म्हणून आता त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सूरु आहे. एसटी चालविली म्हणून एखादा गुन्हा दाखल झाला तरी त्यांना त्याची कोणतीही फिकीर नाही. ते चौकशीला घाबरणारे नाहीत आणि चौकशी लागली तर आम्ही सर्व कार्यकर्तेही त्यांच्यासोबत चौकशीला सामोरे जाऊ. एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील एकमेव कुडाळ तालुक्यातील कुडाळ आणि ओरोस या बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात आले. मालवण येथील बसस्थानकाचे काम सुरू आहे. जिल्ह्यात इतर कुठेही बसस्थानकांचे काम झाले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नांतून कुडाळ डेपोसाठी नुकत्याच नवीन ९ एसटी बस दाखल झाल्या आहेत. आता कुडाळ ते मुंबई ही शयनयान (स्लीपर) बस सेवा सुरु झाली आहे. याचेही श्रेय नाईक यांचेच आहे. प्रत्येक विभागाचा निधी त्यांनी आपल्या मतदारसंघात आणला आहे. याचीच धास्ती भाजपने घेतली असून भाजप पदाधिकाऱ्यांना जळी-स्थळी-काष्टी वैभव नाईकच दिसत आहेत,’ असे श्री. नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT