कोकण

युद्धनौकांची मॉडेल्स ठरणार आकर्षण

CD

३० (पान ५ साठी)

नौसेनेच्या युद्धनौकांच्या मॉडेलचे आकर्षण

सागर महोत्सव ; ११ ते १४ जानेवारीदरम्यान विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या महोत्सवात आगळेवेगळे आकर्षण असणार आहे. भारतीय नौसेनेच्या युद्धनौका व पाणबुडीची मॉडेल्स शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रत्नागिरीकरांनाही ही मॉडेल्स नक्कीच आवडतील. साधारण पाच फूट लांबीची ही मॉडेल्स महोत्सवादरम्यान पाहता येतील. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात महोत्सवाच्या ठिकाणी ती ठेवली जाणार आहेत.
आसमंत फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त नंदकुमार पटवर्धन यांनी या संदर्भात माहिती दिली. फाउंडेशनतर्फे येत्या ११ ते १४ जानेवारीदरम्यान हा महोत्सव गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात रंगणार आहे. शिवाय सागरकिनारा अभ्यासफेऱ्या, लघुपट, व्याख्याने, होडीतून कांदळवन अभ्यासफेऱ्या आणि अंतरजिल्हा महाविद्यालयीन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
महोत्सवाकरिता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासह राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया, कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशन आणि रत्नागिरी मत्स्य महाविद्यालाय यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. गेले वर्षभर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाबरोबर कोस्टल मॅपिंग हा उपक्रम सुरू आहे. पुढे समुद्राच्या/सागराच्या पाण्याचे आम्लीकरण या विषयावर अभ्यास करण्याचा मानस आहे. या महोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने सहभागी होऊन पर्यावरण जागृती, सागर संवर्धनात सहभागी व्हावे, असे आवाहन आसमंत फाउंडेशनने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT