uddhav thakre  sakal
कोकण

Kokan News: आधी लोकसभेची लढाई जिंकू, मग त्या चाळीस गद्दारांना मतपेटीतून गाडू; कोकणात शिवसेना आक्रमक!

Shiv Sena Sindhudurg and Kolhapur District Liaison Chief Arun Dudhwadkar Lok Sabha b

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झंझावात कोकणात येत आहे. याची सुरूवात रायगडपासून सुरू झाली असून सिंधुदुर्गात शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

आधी लोकसभेची लढाई जिंकू आणि नंतर त्या चाळीस गद्दारांना मतपेटीतून गाडू, असा इशारा शिवसेना सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला.

राज्यातील जनता निवडणुकांची वाट पाहत आहे आणि आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची झालेली गद्दारी गद्दारांना होणार, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी आज सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती तालुका कार्यालयाला भेट देऊन उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन केले.

या बैठकीस सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, युवा सेना जिल्हा समन्वयक आणि खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, हिमांशू परब आदी उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सर्वप्रथम त्यांचे आगमन सावंतवाडीमध्ये होणार असून सावंतवाडी येथे गांधी चौकामध्ये ते सकाळी अकरा वाजता जनतेशी संवाद साधतील.

यानंतर ते कुडाळ आणि दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्री. दुधवडकर यांनी सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला.

ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (ठाकेर गट) उभारी घेईल. ज्यांनी मानसन्मान, पदे दिली त्यांच्याशी गद्दारी केलेल्यांना आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवणार आहे. या गद्दारांचे पतन तर होणारच आहे. मतपेटीतून जनता या शिवसेना पक्षातून गेलेल्या १३ गद्दारांना धडा शिकवणार आहे.

लोकसभा निवडणूक ही गद्दारांची पतन करणारी निवडणूक असणार आहे आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ४० गद्दारांना जनता मतपेटीतून गाडून टाकेल. जनतेची सर्व सहानुभूती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. ज्यांनी पक्षाशी, पक्षप्रमुखांशी गद्दारी केली त्यांचा हिशोब या निवडणुकीत चुकता केल्याशिवाय जनता राहणार नाही.’’

सावंतवाडी तालुक्यात प्रथम आगमन
ते पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडी तालुक्यांमध्ये सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगमन होणार असून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.

पक्षप्रमुखांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारून आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसैनिक पेटून उठून काम करतील. ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच मुंबईतील चाकरमानी आणि शिवसैनिकही सहभागी होणार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT