Maghi Ganeshotsav esakal
कोकण

Maghi Ganeshotsav : माघी उत्सवासाठी गणपतीपुळेत तब्बल 45 हजार भाविक; समुद्र किनाऱ्यावरही पर्यटकांची मोठी गर्दी

माघी गणेशोत्सवाला गणपतीपुळे मंदिरात उत्साहात आरंभ झाला.

सकाळ डिजिटल टीम

सध्या दहावी, बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्यामुळे सहलींसह पर्यटकांची कोकणात अपेक्षित गर्दी पाहावयास मिळत नाही.

रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे (Ganapatipule) श्री क्षेत्री माघी गणेशोत्सवाला (Maghi Ganeshotsav) सुरुवात झाली आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांतील भाविक गणपतीपुळेत दर्शनासाठी दाखल होत आहेत. मागील दोन दिवसांत सुमारे ४५ हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यामुळे किनाऱ्यासह गणपतीपुळेमध्ये भाविकांची रेलचेल होती.

माघी गणेशोत्सवाला गणपतीपुळे मंदिरात उत्साहात आरंभ झाला. प्रतिष्ठापनेच्या दिवशी मंगळवार असल्यामुळे अंगारकी (Angarki Sankashti) योग होता. त्यामुळे भाविकांनी गणपतीपुळेमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. यामध्ये सर्वाधिक पश्‍चिम महाराष्ट्रातील म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील भाविकांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिकांनीही दर्शनासाठी गणपतीपुळेत हजेरी लावली होती.

या उत्सवाला गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाकडून किनाऱ्यांवरील जीवरक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्याकडून किनाऱ्यावर गस्तही घालण्यात येत होती. देवस्थानतर्फे भाविकांना रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी मंडप व्यवस्था केली होती. त्यामुळे दुपारी उन्हाचा त्रास झाला नाही. गेल्या दोन दिवसांत सुमारे ४५ हजार पर्यटकांची मंदिरामध्ये नोंद झाली. माघी गणेशोत्सवासाठी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांनी उपस्थिती लावल्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

परीक्षेच्या कालावधीमध्येही गर्दी

सध्या दहावी, बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्यामुळे सहलींसह पर्यटकांची कोकणात अपेक्षित गर्दी पाहावयास मिळत नाही. मात्र माघीमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल भक्त गणपतीपुळेत दाखल झाले आहेत. त्यामुळे गणपतीपुळेतील बाजारपेठेत आर्थिक रेलचेल पाहायला मिळत असून, व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT