Alphonso Mango esakal
कोकण

Alphonso Mango : 'हापूस'चा गोडवा सातासमुद्रापार; आखाती देशात मोठी मागणी, कोकणातून 10,000 पेटी वाशीत

हापूसचा (Alphonso Mango) गोडवा सातासमुद्रापार दरवळू लागला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आखाती देशात आंबा पाठवण्यासाठी फळांवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करावी लागत नाही. त्यामुळे आंबा पाठवण्याचा खर्च कमी येतो.

रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्यापासून बाजारात हापूस आंब्याने हजेरी लावली आहे. त्यामुळे या आठवड्यापासून आखाती देशात आंबा निर्यातीला सुरुवात झाली. हापूसचा (Alphonso Mango) गोडवा सातासमुद्रापार दरवळू लागला आहे. सध्या कोकणातून सुमारे ६ हजार पेटी आंबा वाशी बाजार समितीत (Vashi Market Committee) रवाना होत आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे दोन ते अडीच हजार पेटीचा समावेश आहे.

फेब्रुवारी- मार्चपासून हापूस आंब्याच्या हंगामाची प्रतीक्षा सर्व व्यापार्‍यांसह आंबा खवय्यांनाही असते. यंदे १० फेब्रुवारीपासून आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार सुरूवातीला ५०० ते १००० पेट्यांची आवक होती. सध्या कोकणातून हापूस आंब्याच्या सहा हजार पेट्यांची आवक बाजारात दररोज होत आहे. ही आवक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार आखाती देशातही आंबा निर्यात सुरू करण्यात आली आहे. दर दोन ते तीन दिवसांत हापूस आंबा आखाती देशासाठी रवाना होत आहेत.

सध्या आंब्याचे दर चढे आहेत. पूर्ण हंगामातील ७५ टक्के हापूस आंबा हा दुबई, कतारसारख्या (Dubai, Qatar) आखाती देशात जातो. तर २५ टक्के आंबा हा युरोप, अमेरिका या ठिकाणी पाठवला जातो. आखाती देश हापूस आंब्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आंबा निर्यात नेहमी आखाती देशातूनच सुरू होते. त्यानुसार यावर्षीची सुरुवात झाली आहे. समुद्री मार्गाने मोठ्या प्रमाणावर आंबा आखाती देशासाठी रवाना होत आहे.

विशेष म्हणजे, आखाती देशात आंबा पाठवण्यासाठी फळांवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करावी लागत नाही. त्यामुळे आंबा पाठवण्याचा खर्च कमी येतो. त्यामुळे निर्यातदारांवर आर्थिक भार कमी असतो. शिवाय आखाती देशांमध्ये हापूस आंब्याला सर्वाधिक मागणी असते. या आठवड्यापासून आखाती देशासाठी आंब्याची निर्यात सुरू झाली आहे. सध्या आवक कमी असल्याने निर्यातदेखील कमी होत आहे. जशी आवक वाढेल तशी निर्यात वाढण्याची शक्यता आहे.

दरावरही परिणाम

हापूसच्या बरोबरीने केरळ आंध्रसह कर्नाटकमधील आंबेही वाशी बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे हापूसपुढे आव्हान आहे. तसेच त्याचा दरावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT