Mirya-Nagpur Highway esakal
कोकण

Mirya-Nagpur Highway : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पुन्हा भूसंपादन होणार; मंत्रालयाकडून अधिसूचना जारी

कोकणाला पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भाशी जोडणाऱ्‍या या मार्गासाठी रत्नागिरी ते कोल्हापूर १३४ किमीच्या मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १३ वर्षे रखडले आहे. त्या तुलनेत मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे.

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्ग (Mirya-Nagpur Highway) १६६ च्या चौपदरीकरणासाठी काही ठिकाणी जादा जमीन आवश्यक असल्याने पुन्हा भूसंपादन होणार आहे. त्यासाठी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

यामध्ये रत्नागिरी (Ratnagiri), संगमेश्वर तालुक्यातील खेडशी, पाली बाजार पेठ, खानू, नाणिज, झाडगाव, नाचणे, दख्खन, कोंडगाव, साखरपा, साखरपा (खुर्द), जंगलवाडी, करंजारी या गावांतील आवश्यक असणारी जमीन संपादित केली जाणार आहे. याबाबत २१ दिवसांत कोणाच्या हरकती असतील त्या मागविण्यात आल्या आहेत.

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ५ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली असून, २३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. कोकणाला पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भाशी जोडणाऱ्‍या या मार्गासाठी रत्नागिरी ते कोल्हापूर १३४ किमीच्या मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले. निवाडा जाहीर होईल तसा शासनाकडून भूसंपादनाचा निधी प्रशासनाला प्राप्त होत आहे. जिल्ह्यात मिऱ्या ते साखरप्यापर्यंत जिल्ह्यातील २८ गावांचा यामध्ये समावेश आहे. त्यापैकी बहुतेक गावांना निधी मिळाला आहे, तर काही गावे अजूनही निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १३ वर्षे रखडले आहे. त्या तुलनेत मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी कॉंक्रिटीकरणाची एक लाईन पूर्ण झाली आहे, तर काही ठिकाणी काम प्रगतिपथावर आहे. या महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदाराने वर्षात चांगला टप्पा पूर्ण केला आहे. परंतु अजूनही या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी काही भागांमध्ये जागेची गरज आहे. म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुन्हा १२ ठिकाणी भूसंपादनासाठी अधिसूचना जारी केली आहे. या गावांतील राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ अजून निर्दिष्ट करावयाचा आहे. ज्याचे संपादित जमिनीशी हितसंबंध आहेत, ते या अधिसूचनेचे प्रसिध्दीच्या दिनांकापासून २१ दिवसांच्या आत आक्षेप घेऊ शकतात.

मिऱ्या-नागपूर महामार्गासाठी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना काढली आहे. यामध्ये बारा गावांमध्ये रुंदीकरण, चौपदरी मार्ग करण्यासाठी जादा भूसंपादनाकरिता पुन्हा अधिसूचना जारी केली आहे.

-जीवन देसाई, प्रांताधिकारी, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT