Konkan Expressway esakal
कोकण

प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे, आंबोळगडचा होणार विकास; सागरी मार्गाजवळील 105 गावात उभारणार 'इतकी' विकास केंद्रे

मुंबई ते कोकण प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी एमएसआरडीसीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

या निर्णयानुसार पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ४४९.८३ चौ. किमी क्षेत्रफळात आता एमएसआरडीसीकडून १३ विकास केंद्रे उभारली जाणार आहेत.

रत्नागिरी : मुंबई ते कोकण (Mumbai to Konkan) प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी एमएसआरडीसीमार्फत ३८८ किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग (Konkan Expressway) आणि ४९८ किमीचा रेवस ते रेडी सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) बांधण्यात येणार आहे. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि रायगडमधील १०५ गावांमध्ये १३ विकास केंद्रे उभारली जाणार आहेत. त्याचा आराखडा एमएसआरडीसी तयार करत आहे. त्यामध्ये प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळे (Ganapatipule) व आंबोळगडचा समावेश आहे.

कोकणातील १०५ गावांतील विकासासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (Maharashtra State Road Development Corporation) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयानुसार पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ४४९.८३ चौ. किमी क्षेत्रफळात आता एमएसआरडीसीकडून १३ विकास केंद्रे उभारली जाणार आहेत. मुंबई ते कोकण प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी एमएसआरडीसीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

या प्रकल्पालगत विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचे सांगत एमएसआरडीसीने (MSRDC) विकास केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव सरकारला दिला होता. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि रायगडमधील १३ केंद्रे निश्चित केली आहेत. हा प्रस्ताव मंजूर केला असून, अधिसूचना आचारसंहिता लागू होण्याआधी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे विकास केंद्रांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे.

कोकणातील चार जिल्ह्यांतील १०५ गावांमधील ४४९.८३ चौरस किमी क्षेत्रफळात विकास केंद्रे बनवण्यात येणार आहेत. सिडकोला अधिकार दिलेल्या १ हजार ६३५ गावांमधून ही १०५ गावे वेगळी काढून त्यासाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाली आहे.

द्रुतगती मार्ग म्हणजे काय

द्रुतगती मार्ग म्हणजेच एक्स्प्रेस वे हा उच्च स्तराचा मार्ग असतो. हा प्रामुख्याने ६ आणि ८ लेनचा असतो. जलदगती वाहतुकीसाठी एक्स्प्रेस वे म्हणजे द्रुतगती मार्ग बांधले जातात. एक्स्प्रेस वेवर टू व्हीलर तसेच कमी गतीच्या वाहनांना परवानगी नसते.

निवडलेली गावे (क्षेत्रफळ चौरस किमी)

आंबोळगड ५०.०५, देवके २५.४२, दिघी २६.९४, दोडावन ३८.६७, केळवा ४८.२२, माजगाव ४७.०७, मालवण १५.७५, नवीन देवगड ४१.६६, नवीन गणपतीपुळे ५९.३८, न्हावे २१.९८, रेडी १२.०९, रोहा २४.८२, वाढवण ३३.८८ या ठिकाणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT