Cashew Seed esakal
कोकण

Cashew Seed : काजू बी'चे दर घसरले, उत्पादनातही मोठी घट; किलोचा दर किती आहे माहितीये?

हंगामाच्या सुरवातीला बऱ्यापैकी दरही होता, मात्र काही दिवसांपासून दरात घसरण होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रतिकूल वातावरण, धुक्यामुळे काजू उत्पादन यावर्षी कमी आले आहे. त्यामध्ये आता वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे.

राजापूर : गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये झालेली कमालीची वाढ आदी विविध कारणांमुळे काजूच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. उत्पादन कमी असल्याने दरामध्ये वाढ होईल, अशी बागायतदारांना आशा होती, मात्र ती फोल ठरली आहे.

काजूच्या दरामध्ये (Cashew Rate) घसरण झाली असून हंगामाच्या प्रारंभाला प्रतिकिलो सरासरी १२५ रुपये असलेला काजू बी'चा दर १०५ रुपयांपर्यंत घसरला आहे. ही घसरण बागायतदारांची चिंता वाढवत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाचाही काजू बीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांकडून (Farmers) सांगितले जात आहे. अशा स्थितीमध्ये शेतकरी, बागायतदारांना काजू बी विक्रीला चांगला दर मिळेल, अशी आशा होती.

त्याप्रमाणे हंगामाच्या सुरवातीला बऱ्यापैकी दरही होता, मात्र काही दिवसांपासून दरात घसरण होत आहे. हंगामाच्या सुरवातीला १२५ ते १२७ रुपये प्रतिकिलो असलेला दर आता १०५ रुपयांपर्यंत घसरला. त्यामध्ये काजू बीचा आकार लहान असल्यास तो काही ठिकाणी शंभर रुपयेही मिळत आहे.

दृष्टिक्षेपात...

प्रतिकूल वातावरणाचा काजू हंगामाला फटका

यावर्षी सरासरी ३० ते ४० टक्के उत्पादन

वाढत्या तापमानाचा काजू बीला फटका

दिवसागणिक काजू बी खरेदी दरामध्ये घसरण

प्रतिकूल वातावरण, धुक्यामुळे काजू उत्पादन यावर्षी कमी आले आहे. त्यामध्ये आता वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. असे असले तरी सुरवातीचा काजू बीचा असलेला दर समाधानकारक असल्याने बऱ्यापैकी उत्पन्न मिळेल अशी आशा होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांमध्ये घसरलेला दर पाहता चांगल्या उत्पन्नाची आशाही मावळली आहे.

-राजेश शिर्के, बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT