Olive Ridley Tortoise esakal
कोकण

Olive Ridley Turtle : ऑलिव्ह रिडले कासवांची तब्बल 5000 पिल्ले समुद्रात विसावली, किनाऱ्यावर 141 घरट्यांचं संरक्षण

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील कासव संवर्धन मोहिमेला (Turtle Conservation Campaign) चालना मिळाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

ऑलिव्ह रिडले कासवांचे (Olive Ridley Tortoise) संवर्धन करण्यासाठी गेल्या काही वर्षांत वनविभागाकडून (Forest Department) विशेष प्रयत्न सुरू आहेत.

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील कासव संवर्धन मोहिमेला (Turtle Conservation Campaign) चालना मिळाली आहे. यंदा येथील किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची संख्या गतवर्षीपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत १४१ घरटी संरक्षित केली असून, त्यात १४ हजार १३३ अंडी संरक्षित केली गेली. त्यातील सुमारे ५ हजार पिल्ले समुद्रात विसावली आहेत.

ऑलिव्ह रिडले कासवांचे (Olive Ridley Tortoise) संवर्धन करण्यासाठी गेल्या काही वर्षांत वनविभागाकडून (Forest Department) विशेष प्रयत्न सुरू आहेत. समुद्रकिनारी भागातील लोकांमध्ये जनजागृती करत स्थानिकांच्या मदतीने घरटी संवर्धनासाठी कासवमित्र तयार केले आहेत. त्यामध्ये पावस परिसरातील गावखडी, गणेशगुळे किनाऱ्यावर कासव संवर्धनाचे काम ग्रामपंचायत आणि वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप डिंगणकर, रोशन पाटील, राकेश पाटील हे करत आहेत.

तुलनेत यंदा कासवांचा विणीचा हंगाम उशिराने सुरू झाला; मात्र तरीही सर्वाधिक घरटी या किनाऱ्यावर सापडली आहेत. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या किनाऱ्यावर १४१ घरटी संरक्षित करण्यात यश आले आहे. योग्य कालावधी झाल्यानंतर अंड्यातील पिल्ले बाहेर येतात. त्यांच्यावर कासवमित्र लक्ष ठेवून असतात. त्यामुळे आपसूकच त्यांचे संरक्षण होते. आतापर्यंत ५ हजार ५५ पिल्ले समुद्रात सोडली आहेत.

अजून पन्नास टक्के अंडी शिल्लक आहेत. ती टप्प्याटप्प्याने समुद्रात विसावतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, यंदा सर्वाधिक अंड्यांचे संवर्धन गुहागर तालुक्यात झाले आहे. त्या पाठोपाठ कदाचित गावखडी येथील किनाऱ्यावर सर्वाधिक अंडी सापडली असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गावखडी येथे कासव संवर्धनाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या किनाऱ्यावर गतवर्षीपेक्षा अधिक अंडी संरक्षित झाली आहेत. हा किनारा सुरक्षित असल्यामुळे कासवं अंडी देण्यासाठी येत असावीत.

- प्रकाश सुतार, परिक्षेत्रीय वनाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT