कोकण

आंबवली ग्रामदेवतेचा १९ पासून जीर्णोद्धार

CD

पान ५

आंबवली ग्रामदेवतेचा १९ पासून जीर्णोद्धार
खेड : तालुक्यातील आंबवली येथील ग्रामदेवता पाषाणी मूर्तीचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना सोहळा १९ ते २१ एप्रिल या कालावधीत होणार आहे. महादेव शिवाचार्य वायकर महाराज शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना व राजपुरोहित प्रकाश जंगम यांच्या मंत्रघोषात सोहळा होईल. १९ ला सकाळी ९.३० वाजता नवीन मूर्तीचे आगमन झाल्यानंतर गंगापूजन, ग्रामदैवत नवीन मूर्तीची सवाद्य मिरवणूक, मूर्तींना धान्यदिवास जलादिवास, लक्ष्मीवास, पुष्पादिवास, शयनवास विधी झाल्यानंतर रात्री ९ वा. खडपोली येथील सतीश सावंत यांचे कीर्तन होईल. आंबवली-भिंगारवाडी येथील बाऊलवाडी धनगरी नृत्य, आंबवलीतील महिला दिंडी भजन होईल. २० ला धर्मध्वज पूजन, मूर्ती स्थापनेसाठी विधीविधान पूजन, होमहवन, शांतीविधान, देवदेवतांची मूर्ती स्थापना, रायगड येथील रवींद्र महाराज सकपाळ यांचे रात्री ९ वा. कीर्तन, रात्री १२ वा. महाड येथील सुजितबुवा देशमुख व कणकवली येथील रामकृष्णबुवा परब यांच्यात भजनाची डबलबारी होईल. २१ ला सकाळी ६.२० वा. मूर्तींना जलाभिषेक झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठापना पूर्णाहुती, महाआरती, मंत्रपुष्पांजली, मानसपूजा व गाऱ्हाणे होईल. रात्री ९ वा. पुणे येथील सुप्रिया साठे ठाकूर यांचे कीर्तन, रात्री १२ वा. आयनीभोईवाडी येथील शाहीर रत्नाकर महाकाळ यांचे भारूडी भजन व नमननाट्य होईल.

खेडमध्ये निवडणूक आढावा बैठक
खेड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत तालुका अल्पसंख्याक विभागाची निवडणूक आढावा बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जलाल राजपूरकर, अजय बिरवटकर, स. तु. कदम, कार्याध्यक्ष दत्ताराम गोठल, अजिंक्य आंब्रे, दुर्वेश पालेकर, आत्माराम कदम, अॅड. आनंद भोसले, सरपंच मुखत्यार कावलेकर, मोझम अ. गणी परकार आदी उपस्थित होते. खाडीपट्टा विभागातील सलीम चौगले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


उन्हाळी सुटीसाठी खेडमधून जादा बसफेऱ्या
खेड : बसस्थानकातून उन्हाळी सुटीसाठी १ एप्रिलपासून लांब पल्ल्याच्या मार्गांवर ६ जादा बसेस सोडण्यास प्रारंभ झाला आहे. १५ एप्रिलपासून शाळा, महाविद्यालयांनादेखील सुट्या पडण्यास सुरुवात होणार असल्याने उन्हाळी सुट्यां‍साठी जादा बसेस चालवण्यासाठी आगार सज्ज झाले आहे. आगाराने मुंबई, बोरिवली, नालासोपारा, ठाणे, कल्याण, आंबेजोगाई, लातूर, चिंचवड, कोल्हापूर, स्वारगेट, विठ्ठलवाडी, भांडूप, विरार, वसई आदी लांब पल्ल्यांच्या मार्गांवरील २५ नियमित फेऱ्यांसह ६ जादा बसेस सोडल्या आहेत. यामध्ये सकाळी ६.३० वा. खेड-तुळशी-बोरिवली, सकाळी ९.३० वा. खेड-बोरिवली, सकाळी १०.१५ वा. शिवतर-खेड-बोरिवली, १०.३० वा. खेड- भांडूप, दुपारी १.१५ वा. खेड-ठाणे व रात्री ९.३० वा. खेड-बोरिवली या जादा बसफेरीचा समावेश असून, या फेऱ्या दिवसाकाठी २९२० कि. मी. चे अंतर कापत आहेत. शाळा-महाविद्यालयांना सुट्या पडल्यानंतर आणखी जादा बसेस सोडण्यावर व्यवस्थापनाचा भर राहणार असून या दरम्यान ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

ज्ञानदीपतर्फे मतदार जनजागृती पथनाट्य
खेड : मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्यावतीने तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे युवा मतदार जागृती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांसह घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील सुमारे ३०० विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या पथनाट्य सादरीकरणादरम्यान तहसीलदार सुधीर सोनवणे, नायब तहसीलदार अनंत सीनकर यांनी विद्यार्थ्यांना निवडणुकीचे महत्त्व सांगून ज्ञानदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे कौतुक केले. आजीवन शिक्षण व विस्तार विभागप्रमुख प्रा. भरत गोंजारे, प्रा. डॉ. उमेशकुमार बागल, प्रा. किशोर मंडले यांचे मार्गदर्शन लाभले.

सुकीवलीतील बोअरवेल दुरुस्तीची मागणी
खेड : तालुक्यातील सुकीवली सोनारवाडी येथील शासकीय योजनेतून बांधलेली विहीर नादुरुस्त झाली असून, बोअरवेलची दुरुस्ती करण्याची मागणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे केली आहे. नादुरुस्त झालेली बोअरवेल दुरुस्त केल्यास काही अंशी पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडे तरुणांची गर्दी; ५०० इच्छुकांच्या मुलाखती!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन हद्दीत खुनाची घटना; संशयिताच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना!

Sinhagad Fort Exhibition : सिंहगडावर शिवकालीन वैभवाचा जागर; ९९ दुर्ग प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन!

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

SCROLL FOR NEXT