Railway News sakal
कोकण

Railway News: उन्हाळी हंगामासाठी धावणार जादा रेल्वे; कोकणी माणसाला मिळणार दिलासा

Kokan News: मध्य रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. | Kokan News: Central Railway has decided to run special trains in coordination. |

CD

Kankavli News: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक (एलटीटी) ते कोचुवेली विशेष साप्ताहिक गाडी धावणार आहे.

गाडी क्र. ०१४६३ लोकमान्य टिळक (एलटीटी) ते कोचुवेली विशेष साप्ताहिक रेल्वे ११ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर गुरुवारी एलटीटी येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल.

परतीसाठी गाडी क्र. ०१४६४ कोचुवेली ते लोकमान्य टिळक (एलटीटी) कोचुवेली येथून १३ एप्रिल ते ८ जून पर्यंत दर शनिवारी सायंकाळी ४.२० ला सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मनाग्लुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरनूर जं., एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम आणि कोल्लम जंक्शन या स्थानकावर थांबेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ सप्टेंबर २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 6 सप्टेंबर 2025

अग्रलेख : तंत्रज्ञानाचे ‘विक्रम’ संवत!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT