Sindhudurg Temperature esakal
कोकण

Sindhudurg Temperature : सिंधुदुर्गात उन्हाच्या तीव्र झळा; तापमान 38 अंशांवर, जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

कडक उष्मा आणि त्यात ढगाळ वातावरण यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती.

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग गेल्या काही दिवसांपासून चांगलाच तापला आहे. जिल्ह्याच्या विविध भागांतील तापमान सरासरी ३६ ते ३८ अंश सेल्सियसपर्यंत (Summer Season) पोहोचले आहे.

वैभववाडी : कडकडीत उन्हामुळे (Sindhudurg Temperature) जिल्ह्यातील बहुतांश नद्या आणि लघुप्रकल्पांतील पाण्यामध्ये झपाट्याने घट होऊ लागली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेकडो एकर शेती संकटात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाण्याची अधिक गरज असलेल्या ऊसशेतीही अडचणीत येण्याची शक्यता आहे. तापमानवाढ कायम राहिल्यास जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.

सिंधुदुर्ग गेल्या काही दिवसांपासून चांगलाच तापला आहे. जिल्ह्याच्या विविध भागांतील तापमान सरासरी ३६ ते ३८ अंश सेल्सियसपर्यंत (Summer Season) पोहोचले आहे. आज दुपारीही जिल्ह्याच्या अनेक भागांत तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सियस होते. मात्र, त्याची तीव्रता ४० अंश सेल्सियस असल्याचे जाणवत होते.

कडक उष्मा आणि त्यात ढगाळ वातावरण यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. वाढलेल्या तापमानाचा एकीकडे जिल्ह्यात प्रमुख आंबा, काजू पिकांवर (Cashew Crop) परिणाम होत असताना आता नद्या आणि लघुप्रकल्पातील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. काही नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहेत. वैभववाडी तालुक्यातील शुक नदी, कणकवलीतील जानवली, गड यासारख्या नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे.

वैभववाडीतील शुकनदीच्या पाण्यावर शेकडो एकर ऊसशेती अवलंबून आहे. या नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे ही शेती संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी खांबलवाडी प्रकल्पाचे पाणी शुक नदीपात्रात सोडण्याची मागणी केली आहे. हीच स्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. तापमानाची तीव्रता कायम राहिल्यास जिल्ह्यात पाण्याची स्थिती गंभीर बनणार आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर बनण्याचा अंदाज आहे.

पाणीटंचाईचे संकेत

जिल्ह्याच्या अनेक भागांत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतीकरिता पाणी कमी पडू लागले आहे. पावसाळा सुरू होण्यास अजूनही दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी मे महिन्यात भीषण पाणीटंचाईचे संकेत मिळू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोव्याचे मंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

Raju Shetti: शेतकऱ्यांना यंदा उच्चांकी दर मिळवून देणार: राजू शेट्टी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दर निर्णायक बैठक, ऊसतोडीची गडबड करू नये

IPS अधिकाऱ्यावर अंत्यसंस्कार होण्याआधी त्यांच्यावरच आरोप करत ASIने स्वत:ला संपवलं; पोलीस दलात खळबळ

Gautam Gambhir: तुमच्या फायद्यासाठी खेळाडूला लक्ष्य करू नका; गौतम गंभीर, हर्षित राणावरून माजी कर्णधार श्रीकांत यांना सुनावले

Latest Marathi News Live Update : सीमाप्रश्‍नावरून पुन्हा वाढला तणाव; महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळकेंवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT