कोकण

बेकायदा बांधकामप्रकरणी माडखोलमधील दाम्पत्याचे आंदोलन

CD

swt2514.jpg
79817
सावंतवाडी ः माडखोल येथील राऊळ दाम्पत्याने गुरुवारी प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडले.

बेकायदा बांधकामप्रकरणी
माडखोलमधील दाम्पत्याचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः माडखोलमधील एका लोकनियुक्त सदस्याने पदाचा दुरुपयोग करून सामायिक मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम करून राहत्या घराला धोका निर्माण केल्याचा आरोप करत ते बांधकाम तात्काळ काढण्यात यावे, या मागणीसाठी माडखोल येथील रहिवासी ज्ञानदेव फटू राऊळ आणि त्यांची पत्नी जयवंती ज्ञानदेव राऊळ यांनी येथील प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडले आहे.
माडखोलमधील एका लोकनियुक्त सदस्याने पदाचा दुरुपयोग करून सामायिक जमिनीमध्ये अनधिकृत बांधकाम उभारले आहे. या प्रकाराचे कोणीही दखल घेत नसल्याने आम्हाला कोण न्याय मिळवून देईल? असा प्रश्न संबंधित राऊळ दाम्पत्याने उपस्थित केला आहे. त्यामुळे कायदेशीर तरतुदीनुसार संबंधिताचे सदस्य पद रद्द करण्यात यावे व अनधिकृत बांधकाम तोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
न्याय मिळेपर्यंत आंदोलन असेच चालू राहील, असा इशाराही त्यांनी दिला. याबाबत त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, माडखोल-फौजदारवाडी येथील एका लोकनियुक्त सदस्याने आपल्या पदाचा गैरवापर करत अतिक्रमण करून माझ्या घराच्या बाजूला लागून साधे तीन फूटही अंतर न सोडता आमच्या सामायिक मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम करून माझ्या राहत्या घराला धोका निर्माण केला आहे. आम्हा वयोवृद्ध दांपत्याला मुलगा नसल्याने शेतीच्या माध्यमातून आम्ही आमचा उदरनिर्वाह करत आहोत.
दरम्यान न्याय मिळावा यासाठी तंटामुक्ती विभागाकडे याबाबत अर्ज करून सुद्धा अध्यक्ष व सचिव यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे महसुली दंडाधिकारी म्हणून बेकायदा बांधकाम करत कायदा हाती घेतलेल्या लोकप्रतिनिधीचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करून बांधकाम पाडण्यात यावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT