कोकण

कणकवलीवरील टंचाईचे सावट होणार दूर

CD

लोगो ः सकाळ इम्पॅक्ट
----
80872
बातमीचे कटआऊट वापरा
---

80836
कणकवली : शहरातील गडनदीपात्रात नगरपंचायतीच्यावतीने गाळ उपसा सुरू करण्यात आला आहे.


कणकवलीवरील टंचाईचे सावट होणार दूर

गडनदीपात्रात गाळ उपसा ः शिवडाव धरणाचेही पाणी येणार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३० ः शहरावर असणारे पाणी टंचाईचे सावट दूर झाले आहे. नगरपंचायतीच्यावतीने गडनदीपात्रात गाळ उपसा करून पाणी पातळी वाढवली जात आहे. याखेरीज उद्या (ता.१) पासून शिवडाव धरणाचेही पाणी नदीपात्रात सोडले जाणार असल्‍याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.
‘कणकवलीवर पाणीटंचाईचे सावट’, अशा आशयाची बातमी ‘सकाळ’ने १७ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली होती. याची दखल नगरपंचायत प्रशासनाने घेतली.
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी गडनदीपात्रातील कनकनगर येथील जॅकवेलमधून पाणी उपसा केला जातो. या जॅकवेलच्या ठिकाणी पाणीसाठा संपुष्टात येत असल्‍याने शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले होते. या समस्येवर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला होता. यावर तातडीची उपाययोजना म्‍हणून जॅकवेल असलेल्‍या भागात शनिवारपासून (ता.२७) गाळ उपसा करण्यात आला. त्‍यामुळे जॅकवेलच्या ठिकाणी पाणीसाठा वाढला आहे. दरम्‍यान, पुढील काळातही पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नगरपंचायत प्रशासनाने शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यानुसार उद्यापासून शिवडाव धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्‍याची माहिती पाटबंधारे विभागाने नगरपंचायत प्रशासनाला दिली आहे.
---
कोट
शिवडाव धरणातील पाणी नगरपंचायतीच्या जॅकवेल भागापर्यंत येण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागतो. त्‍यामुळे ७ किंवा ८ मेस शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात दाखल होईल. त्‍यानंतर पाऊस पडेपर्यंत शहराला पाणी टंचाईचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात येईपर्यंत कनकनगर येथील बंधाऱ्यात शिल्‍लक पाणी पंपाच्या माध्यमातून जॅकवेलपर्यंत आणण्याचीही कार्यवाही केली जाईल.
- परितोष कंकाळ, मुख्याधिकारी
---
कोट
कणकवली नगरपंचायतीने गड नदीपात्रात केलेला गाळ उपसा हा पाणीटंचाईवरील तत्कालीन उपाय आहे. कणकवली शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी कनकनगर आणि मराठा मंडळ येथील बंधाऱ्याच्या पाण्याला गळती लागू नये यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. या बंधाऱ्यामध्ये पाटबंधारे विभागाऐवजी नगरपंचायतीकडून पाणी अडविण्याबाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे.
- अशोक करंबेळकर, सामाजिक कार्यकर्ते, कणकवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT