कोकण

पारंपरिक ढोलवादन स्पर्धेत फणसवणे प्रथम

CD

13 (टूडे 3 साठी)

- rat13p1.jpg-
24M83272
फणसवणेतील ढोलवादन स्पर्धेत सहभागी स्पर्धक.

पारंपरिक ढोलवादन स्पर्धेत फणसवणे संघ प्रथम

नवलाई मित्रमंडळातर्फे आयोजन; हेंदली द्वितीय तर मलदोबा तिसरा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः नवलाई मित्रमंडळ कळंबस्ते तेलेवाडीतर्फे भरवण्यात आलेल्या पारंपरिक ढोलवादन स्पर्धेत वाघजाई मित्रमंडळ फणसवणे संघाने प्रथम, हेंदली संघाने द्वितीय तर मलदोबा संघ तिसऱ्या क्रमांक पटकावला.
संगमेश्वर तालुक्यातील तेलेवाडी येथे श्री सत्यनारायणाची महापूजा झाली. यानिमित्त कळंबस्ते नवलाई मित्रमंडळाने पारंपरिक ढोलवादन स्पर्धा आयोजित केली होती. ग्रामीण भागातील नष्ट होत चाललेले पारंपरिक खेळ, मर्दानी खेळ यांचे आयोजन करून परंपरा जतन करण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. पहिल्या वर्षी ताशेवादन, गतवर्षी लाठीकाठी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या तर नुकतीच पारंपरिक लाकडी ढोलवादन स्पर्धा घेण्यात आली. या वेळी पंचक्रोशीतील अनेक संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे यांच्या झाले. या प्रसंगी खातू म्हणाले, ढोलवादन हे पूर्वपार शिवकालीन असून, त्यापूर्वीही ढोलवादन होत होते. आता या वादनात ताशाने प्रवेश केल्याने या पारंपरिक वादनाचा नाद बदलत चालला आहे. आज ढोलवादन मागे पडत असून, सध्या पुणेरी ढोल आणि नाशिक ढोल याचे आकर्षण अधिक असल्याने कोकणी ढोल स्पर्धेतून मागे पडत चालला असल्याचे सांगून या वादनात कोठेतरी शिस्तबद्धता यावी म्हणून पूणे येथे १९६० ला गणपती उत्सवात अप्पा पेंडसे यांनी ढोलपथकाची स्थापना केली. आज नाशिक आणि पुणे ढोलपथकात हजारो तरुण-तरुणी आपले करिअर करत आहेत; मात्र कोकणी पारंपरिक ढोलवादनाला व्यासपीठ मिळावे म्हणून केलेला हा प्रयत्न असल्याची माहिती दिली. ढोलवादन स्पर्धेत वाघजाई मित्रमंडळ फणसवणेने प्रथम क्रमांक पटकावला. हेंदली संघाने द्वितीय तर मलदोबा संघ तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी पंच म्हणून संगमेश्वरचे सुनील इंदुलकर, सोनगिरीचे अजिंक्य रसाळ यांनी काम पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खातू, संतोष नेवरेकर यांनी केले.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahapalika Election: सर्वात मोठी बातमी! 'या' प्रभागातील निवडणूकीला न्यायालयाची अंतरिम स्थगिती, मतदान कधी होणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

Madhav Gadgil: ‘नीरी’ला कटू सत्याची करून दिली आठवण; पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण अहवालातील त्रुटी केल्या होत्या उघड!

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT