कोकण

आद्य शंकराचार्यांच्या उपदेशाचे पालन करा

CD

२२ (टुडे ३ साठी)


rat१३p१०.jpg-
P२४M८३३०८
रत्नागिरी : आद्य शंकराचार्य जयंती कार्यक्रमात व्याख्याते वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांचा सत्कार करताना प्रतिभा प्रभुदेसाई. डावीकडून वैद्य मंदार भिडे, जयराम आठल्ये, डॉ. कल्पना आठल्ये
--------------

आद्य शंकराचार्यांच्या उपदेशाचे पालन करा

वेदमूर्ती सचिन भाटवडेकर ः सनातन वैदिक हिंदू धर्माचा भारतवर्षात प्रसार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : जगद्गगुरू आद्य शंकराचार्यांनी अत्यंत नम्र होऊन स्तोत्ररचना केल्या. कोणत्या परिस्थितीत या रचना केल्या आहेत हे जाणून घेतले पाहिजे. ते अतिशय विद्वान पंडित होते; परंतु आपल्यासारख्या सामान्यांसाठी ही सर्व स्तोत्ररचना करून सनातन वैदिक हिंदू धर्माचा अखंड भारतवर्षात प्रसार केला. वेदांचा नित्य अभ्यास करा, त्यातून ज्ञान व विज्ञानाची उत्पत्ती होते. विहित कर्म करा, त्यातून परमेश्वर कृपा होते, असा आद्य शंकराचार्यांनी उपदेश केला आहे, असे प्रतिपादन वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांनी केले.
झाडगाव येथील श्री. गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात भाटवडेकर बोलत होते. राणी लक्ष्मीबाई सभागृहात रविवारी हा कार्यक्रम झाला. पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्यावतीने प्रतिभा प्रभुदेसाई यांनी भाटवडेकर यांचा सत्कार केला. सचिव जयराम आठल्ये यांनी स्वागत केले. डॉ. कल्पना आठल्ये यांनी गेली आठ वर्षे कार्यक्रम केला जात असल्याचे सांगितले.

भाटवडेकर म्हणाले, प्रत्येक स्तोत्राचे छंद भिन्न भिन्न आहेत. एकदा काशीक्षेत्रात गंगास्नानाला जाताना शंकराचार्यांसमोर चांडाळ आला. तो अत्यंत गलिच्छ, फाटक्या वस्त्रांसह कुत्र्यांना घेऊन होता. त्याला दूर होण्यास शंकराचार्यांनी सांगितल्यानंतर त्याने मला म्हणजे कोणाला सांगत आहात, शरीराला की आत्म्याला असा प्रश्न केला. ज्याच्याकडून ज्ञान मिळतं तो गुरूच असतो, या हेतूने शंकराचार्यांनी त्याला वंदन केले व चांडाळाकरिता मनिषापंचकम् हे स्तोत्र रचले.
-------------
कनकधारा स्तोत्र
भिक्षा मागण्यासाठी गेले असता गरीब महिलेकडे देण्यासाठी काहीच नव्हते. तिने सुकलेला आवळा दिल्यानंतर शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्र रचले व त्यामुळे महिलेच्या घरात सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला. हस्तामलक स्तोत्र, षट्पदि स्तोत्र, उपदेश करणारे पंचकस्तोत्र महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस...सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT