कोकण

पोंक्षेमार्गे आरवली रस्ता कामाला गती

CD

पोंक्षेमार्गे आरवली
रस्ता कामाला गती
संगमेश्वर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या तुरळ ते आंबव पोंक्षेमार्गे आरवली या मार्गाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. या कामासाठी साडेसात कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या पूर्ण मार्गावरील मोऱ्या नव्याने बांधण्यात येत आहेत. त्यावर ग्रीट टाकून रस्ता वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे. उर्वरित डांबरीकरण पावसानंतर केले जाणार असल्याची माहिती संबंधित खात्याने दिली आहे. या रस्त्याचा माखजनसह अन्य गावांनाही होणार आहे. माखजनहून आरवलीला जाण्यासाठी बुरंबाडमार्गे न जाता आंबव पोंक्षेमार्गे गेल्यास ४ किलोमीटर अंतर वाचणार आहे.
-------
वाहन खरेदीत
लाखोंची उलाढाल
रत्नागिरी : साडेतीन मुहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत शुक्रवारी रत्नागिरीत सोन्यासह नव्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करत कोट्यवधीची उलाढाल झाली. सोनेखरेदी, वास्तूप्रवेश, विवाह आदी शुभकार्यासाठी हा योग महत्वाचा मानला जात असल्याने अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर अनेक ठिकाणी वास्तूप्रवेश झाले तर अनेकांनी नवीन मालमत्तांची खरेदी करत मुहूर्त साधला. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीतही लाखोंची उलाढाल झाली. गुढीपाडव्याला सोन्याचा दर ७५ हजार २०० रुपये प्रतितोळा होता तर हाच दर अक्षयतृतीयेला ७२ हजार ५०० पर्यंत घसरल्याने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यासाठी येथील सराफा दुकानांत ग्राहकांची गर्दी होती. सोन्याचे दर ऐन मुहुर्तालाच घसरल्याने हा योग साधत सोनेखरेदीतही कोट्यवधीची उलाढाल झाल्याचे येथील सराफ नाना सागवेकर यांनी सांगितले. बाजारपेठेत गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. या निमित्ताने बाजारात कोट्यवधीची उलाढाल झाली.
-----
हापूसचे दर
आवाक्यात
रत्नागिरी : स्थानिक बाजारातही आता आंब्यांची आवक वाढल्याने हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. त्यामुळे साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेला हापूस आंब्याचे नवं करण्यात आले. अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर नागरिक मोठ्या प्रमाणात हापूसची खरेदी करतात. यंदा आता अंतिम टप्प्यातील फळ स्थानिक बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे येथील गोखलेनाका, धनजीनाका तसेच मारूती मंदिर येथे अघोषित आंबा महोत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे या गल्ल्या आणि परिसर हापूसच्या वासाने दरवळू लागला आहे. स्थानिक बाजारातही आता हापूसची आवक वाढली आहे तसेच तयार उत्पादनही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. मुहुर्तावर हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने अक्षयतृतीयेला हापूसची चव अनेकांनी चाखत आंब्याचे नवं केले. गतवर्षाच्या तुलनेत यंदा किरकोळ बाजारात तयार आंबा ८०० ते ५०० रुपये डझन दराने उपलब्ध झाला तसेच लहान आकारचे फळही पाचशे ते तीनशे रुपये प्रतिडझन दराने उपलब्ध झाल्याने अनेकांनी शुक्रवारी मुहुर्ताची खरेदी केली.
----
अपंग बालकगृहात
प्रवेश सुरू
रत्नागिरीः सामाजिक न्याय विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय, सांगली जिल्हा परिषद अंतर्गत शासकीय अपंग बालकगृह व शाळा, किल्ला भाग मिरज येथे मोफत प्रवेश सुरू आहे, असे मिरज येथील अधीक्षकांनी कळवले आहे. या ठिकाणी प्रवेशासाठी ६ ते १४ वर्षे (१ ली ते १० वी), अस्थिव्यंग प्रवर्ग (हातापायाने अपंग असलेली बालके), जिल्हा शल्य चिकित्सकांचा किमान ४० टक्के अपंगत्वाचा दाखला आवश्यक आहे. या अपंगाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ तळागळातील गरजू अपंग बालकांनी घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय अपंग बालकगृह व शाळा, किल्ला भाग, बीएसएनएल ऑफीसशेजारी, मिरज यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींनी मुंबई-कोलकाता महामार्ग रोखला, दोन महिन्याचे मानधन न मिळाल्याने आक्रमक पवित्रा

WPL 2026 : श्रेयांका पाटीलच्या ५ विकेट्स अन् RCB चा सलग तिसरा विजय; गुणतालिकेत Mumbai Indians ला बसला धक्का

Nagpur Municipal Election Result : महापालिकेत भाजपच ‘किंग’; चवथ्यांदा मिळविली सत्ता, काँग्रेसचे ‘मिशन १००’ फेल

भाजपच्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून अर्ज भरला अन् विजय मिळवला; बंडखोराकडून महायुतीच्याच अधिकृत उमेदवाराला धोबीपछाड

Stock Market On Budget 2026 : बजेटच्या दिवशी रविवारी शेअर बाजार खुला राहणार का? NSE आणि BSE ने दिली मोठी अपडेट...

SCROLL FOR NEXT