कोकण

अण्णा महाराज पुण्यतिथी उत्सव पिंगुळीत आजपासून

CD

swt145.jpg
83553
सद्गुरू राऊळ महाराज, सद्गुरू अण्णा महाराज

अण्णा महाराज पुण्यतिथी उत्सव पिंगुळीत आजपासून
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ः परमपूज्य सद्गुरू समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा तृतीय पुण्यतिथी उत्सव सोहळा गुरुवारी (ता. १६) सर्व भक्तजनांतर्फे होत आहे. या निमित्ताने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पुण्यतिथी सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहून सद्गुरूंच्या आशिर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
यानिमित्त उद्या (ता. १५) पहाटे ५.३० वाजता नित्य काकड आरती, दुपारी १ ते ३ व रात्री ८ ते १० पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता श्री. परमपूज्य राऊळ महाराज महिला भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन (सप्तसूर), ७ वाजता नित्य सांजआरती, रात्री ८ वाजता माजगाव येथील बालकीर्तनकार मधुरा सावंत (वय १६) हिचे ‘साधूसंघाचे नामाचे महत्त्व’ या विषयावर कीर्तन होणार आहे. गुरुवारी (ता. १६) पहाटे ५.३० वाजता नित्य काकड आरती, सकाळी ६ वाजता विनायक (अण्णा) महाराज यांच्या एकाध्यायी चरित्रामृत व लीलामृताचे समुदायिक पारायण, ७ वाजता समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिर येथे अभिषेक, विनायक (अण्णा) महाराज समाधी मंदिर येथे रुद्र याग, ११ वाजता राऊळ महाराज भक्त मंडळ यांच्यावतीने अण्णा महाराज पादुकापूजन व नामस्मरण, १० वाजता डिझायर हर्बल नवी मुंबई व राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर (बी.एम.डी. मशिनद्वारे हाडांची ठिसुळता तपासणी) घेण्यात येणार आहे. नाव नोंदणी सकाळी ९.३० वाजता दत्तमंदिर पिंगुळी येथे करावी.
सकाळी १२ वाजता राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी यांच्यावतीने रोटरी कल्याण मंडळ, कोल्हापूर व जनकल्याण रुग्णोपयोगी सेवा साहित्य केंद्र, कुडाळ यांच्या सहकार्याने अपंगांना कृत्रिम जयपूर फुटचे वाटप, दुपारी १२.३० वाजता सद्गुरू राऊळ महाराज समाधीस्थानी श्रींची आरती, १ पासून रात्री ११ पर्यंत अखंड महाप्रसाद, दुपारी १ वाजता श्री रामकृष्ण हरी महिला भजन संघ तेंडोली यांचे सुश्राव्य भजन (तबला-सार्थक जामदार, पखवाज-आबा मेस्त्री, संचालन-योगेश प्रभू, तेंडोली), दुपारी ३ वाजता श्री गंभीरेश्वर प्रासादिक भजन मंडळ कुंभवडे (राजापूर) यांचे भजन, ६ वाजता सद्गुरू समर्थ राऊळ महाराज भक्त मंडळ आजरा-पंचक्रोशी यांचे भजन, सायंकाळी ७ वाजता श्री सद्गुरु राऊळ महाराज व अण्णा महाराज समाधी स्थानी नित्य सांजआरती, ७.३० वाजता आदित्य सामंत यांचे तबला वादन, रात्री ८.३० वाजता राज्यस्तरीय पारंपरिक ढोल-ताशा वादन पथक स्पर्धा होणार आहे. अण्णा महाराज यांचा तृतीय पुण्यतिथी उत्सवानिमित होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक कार्यक्रमांचा व अखंड महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT