कोकण

गावचा विकास ग्रामपंचायतच करु शकते

CD

२५ (टूडे २ साठी)

गावचा विकास ग्रामपंचायतच करु शकते

भास्करराव पेरे-पाटील ; मिळंद येथे कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः स्वातंत्र्यानंतर सात हजार आमदार, खासदार झाले. त्यांनी आपापल्या गावचा विकास किती केला हा प्रश्नच आहे. गावचा विकास आमदार, खासदार नव्हे तर ग्रामपंचायत करु शकते. आपला अधिकार कसा वापरायचा याचा अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्करराव पेरे- पाटील यांनी मिळंद येथील कार्यक्रमात केले.
जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सुहासभाई आयरे यांचा नागरी सत्कार आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्या हस्ते झाला. तर त्यांच्या पत्नी सुनिता आयरे यांचा सन्मान नायब तहसिलदार दीपाली पंडित यांनी केला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ, ज्येष्ठ कार्यकर्ते जयंद्र रावराणे, नागरी सत्कार समिती अध्यक्ष गजानन गुरव उपस्थिते होते. शासनाच्या धोरणावर बोलताना भास्करराव पेरे-पाटील म्हणाले, माणसाचे आयुष्य दिवसे दिवस कमी होत आहे. शासनने ७५ वर्षांनंतर एसटी, आरोग्य योजना मोफत सेवा केली आहे. आज विद्यार्थ्यांना सवलतीची गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वयोवृद्ध व्यक्ती सरकारी संपत्ती आहे. तेव्हा तिची काळजी ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे. नोकरीसाठी नव्हे, तर समाजात वावरण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. याचा विचार करून मुली आणि मुलांना शिक्षण दिले पाहिजे. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी एका विचारांनी काम करावे, असे त्यांनी आवाहन केले.
या वेळी ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ यांनी आयरे यांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक नागरी सत्कार समिती कार्याध्यक्ष शरद मोरे यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडापटू मोहन पाडावे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाजीराव विश्वासराव, प्रकाश आयरे, मोतीराम मोरे, शैलेश आयरे, भास्कर गुरव आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण,नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

SCROLL FOR NEXT