कोकण

पावस-निरुळमध्ये गोठ्यावर माड पडून नुकसान

CD

-rat23p43.jpg
85444
पावस ः निरूळ ठिकवाडी येथील सदानंद ठीक यांच्या गोठ्यावर पडलेले नारळाचे झाड.

निरुळमध्ये गोठ्यावर माड पडून नुकसान
पावस, ता. २३ ः रत्नागिरी तालुक्यातील निरूळ-ठीकवाडी येथे सदानंद गोविंद ठीक यांच्या गोठ्यावर नारळाचे झाड कोसळले. त्यामध्ये गोठ्याचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना गुरुवारी (ता. २३) पहाटे सव्वातीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. पावस पंचक्रोशीत बुधवारी मध्यरात्री आणि गुरुवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. जोरदार वाऱ्यामुळे आंबा आणि काजूच्या बागांचे नुकसान झाले. या वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक भागांमध्ये विजेचे खांब वाकल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. कनिष्ठ अभियंता यांनी तत्काळ भेट देऊन कर्मचाऱ्यांसह वीजपुरवठा सुरळीत केला. गोठ्यावर पडलेल्या झाडामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा तलाठी आकाश भगत, ग्रामसेवक सदानंद शिंदे यांनी पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिरात रिव्हॉल्व्हर घेऊन गेल्याचे प्रकरण पोलिसांना भोवले

SCROLL FOR NEXT