कोकण

निवृत्तीवेतनधारक, कर्मचाऱ्यांना कोषागार कार्यालयाचे आवाहन

CD

निवृत्तीवेतनधारक, कर्मचाऱ्यांना
कोषागार कार्यालयाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ः निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचाऱ्यांना दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती त्यांची वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कोषागार कार्यालयास माहिती द्यावी. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांच्याकडून करण्यात येत आहे.
कोषागारामार्फत निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. हे लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केला जातो. काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जाते आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन कोटींची लाच मागणाऱ्या PSIच्या घरात ५६ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने अन् मालमत्तेची कागदपत्रे; झडतीत काय सापडलं?

Video: प्राजक्ता माळीला काय झालय? रेड कार्पेटवर अशा का अवतारात आली? फोटोग्राफर्संना सुद्धा कळेना, नंतर म्हणाली...

World Cup उंचावणाऱ्या हातांना लागणार मेंहदी, स्मृती मानधनाच्या घरी आता लगीनघाई, कधी होणार विवाह?

MP Udayanraje Bhosale: लोकांवर अन्याय झाल्यावर आवाज उठवतोच: खासदार उदयनराजे: साताऱ्यातील मनोमिलनाेबाबत केलं माेठे विधान..

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT