कोकण

रत्नागिरी-३५० मीटरच्या भिंतीमुळे शीळ धरण सुरक्षित

CD

ra१p१५.jpg
87219
रत्नागिरी ः शीळ धरणाच्या सुरक्षेसाठी बांधण्यात येणारी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण.

शीळ धरण ३५० मीटर भिंतीमुळे सुरक्षित

१२ कोटींचे काम पूर्ण; सांडव्याच्या बाजूचा डोंगर होता खचत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : शीळ धरणाच्या सांडव्याकडील डोंगराळ भाग खचत असल्याने धरणाला धोका निर्माण झाला होता. परंतु धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने ३५० मीटर लांबीची संरक्षक भिंत प्रस्तावित करण्यात आली होती. १२ कोटी खर्च करून ही भिंत आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे शीळ धरण आता सुरक्षित झाले आहे.
शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाला धोका निर्माण झाला होता. अतिवृष्टीमुळे दोन वर्षांपूर्वी डोंगराचा भाग खचला होता. यामुळे संरक्षक भिंतीचा प्रस्ताव पाटबंधरे विभागाने पाठविला होता. तो प्रस्ताव पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला. गेली दोन वर्षे सांडव्याचे काम सुरू आहे. सुमारे १२ कोटीची ही ३५० मीटर लांब अंतराची सिंमेंट क्राँक्रिटीची संरक्षक भिंत आहे. ती आता बांधून पूर्ण झाली आहे. या धरणाच्या सांडव्यातून धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होतो. परंतु भविष्यात डोंगर खचून सांडव्यामध्ये मलबा आला तर धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत खचणाऱ्या डोंगराकडील भाग मजबूत करण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India WTC Final Scenario: टीम इंडिया फायनलमध्ये जाणार की नाही? ICC ने सोपं गणित मांडून गुंता सोडवला की वाढवला?

Jalgaon Gold And Silver Price : खिसा रिकामा होणार! डिसेंबरच्या २१ दिवसांतच सोने ५५०० रुपयांनी तर चांदी २७ हजारांनी महागली

काव्याला रिअर लाईफ पार्थ मिळाला! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील ज्ञानदाचं ठरलं लग्न, गुपचूप उरकला साखरपुडा, मेहंदीचा VIRAL VIDEO

Latest Marathi News Live Update : ग्रँड रोडवरील भाटिया रुग्णालयात अंडरग्राउंड भागात आग लागली; रुग्ण सुरक्षित स्थलांतरित

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसह आरोपींना कोर्टाचा दणका, संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप निश्चिती

SCROLL FOR NEXT