कोकण

हापूस आंब्याच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

CD

- rat३p३.jpg-
P२४M८७४८३
जिल्हा गुंतवणूक परीषदेत मार्गदर्शन करताना प्रणव झुंजारराव.

हापूस आंब्याच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

एक जिल्हा एक उत्पादन योजना ; यंदा २५ लाखांचे उत्पन्न, इंग्लंड, ओमान, अमेरीकेतून मागणी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे तसेच एक जिल्हा एक उत्पादन योजनेर्गंत केलेल्या धोरणात्मक उपक्रमांमुळे हापूस आंब्याच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. वाणिज्य आणि सांख्यिकी महासंचालनालयाकडील माहीतीनूसार २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातून १५.५ हजार किलो आंब्याची निर्यात झाली असून त्यातून ३३ लाख ५६ हजार रूपये उत्पन्न मिळाले. तर २०२२-२३ साली ९५ हजार किलो आंबा निर्यातीमधून १ कोटी ४६ लाख मिळाले. २०२३-२४ साली २०.४ हजार किलो आंबा निर्यातीतून २५ लाख ९ हजार रूपये मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात हापूसची मागणी सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर महाराष्ट्रातून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्यील निर्यात ही ५३ कोटी १९ लाखांवरून २०२३-२४ साली ६२ कोटी ३५ लाखांपर्यंत वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून सयुक्त अरब अमीरात, इंग्लंड, ओमान, अमेरीका, कतार, कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन, कॅनडा व सिंगापूर या देशांमध्ये हापूस निर्यात प्रामुख्याने होत आहे. राज्य शासनाने एक जिल्हा एक उत्पादन योजनेत (ओजीओपी) प्रत्येक जिल्ह्यातील एका उत्पादनाचा उपयोग हा जागतिक बाजारपेठेत निर्यातक्षम करणे असून हापूसच्या निर्यातीच्या संधी वाढवून देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट केली. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. यंदाच्या राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन या पुरस्कारासाठी हापूस आंब्याचे नामांकन करण्यात आले आहे. रत्नागिरीत झालेल्या जिल्हा गुंतवणूक परीषदेमध्ये राज्य शासनाच्या उदयोग विभागाच्या अर्नेस्ट व यंग (ईवाय) चे वरीष्ठ सल्लागार प्रणव झुंजारराव यांनी सांगितले की, आंतराष्ट्रीय एजन्सी, नियमित प्रोत्साहन परीषद आणि उद्योग भागधारक एकत्र येवून एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) हापूस आंब्यांचे उत्पादन विकसीत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. त्यात क्षमता निर्माण कार्यशाळा, राज्य आणि जिल्हास्तरीय निर्यात परीषदा, नियमित जिल्हा प्रोत्साहन(डीईपीसी) परीषदांच्या बैठका, वेगवेगळे सामंजस्य करार यांचा समावेश आहे. रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यामुळे जागतिक स्तरावर वेगळा ठसा उमटवत आहे. विपूल नैसर्गिक संसाधने, सागरी-कृषी उत्पादने आणि प्रसिध्द हापूस आंब्यामुळे तसेच भरभराटीला आलेले रासायनिक क्षेत्र प्रगती व समृध्दीच्या मार्गावर आहे.

------
खरेदीदार ते विक्रेता अशी साखळी

उद्योग विभागाने कोकणात विविध कार्यक्रमांत आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय प्रतिनिधींना हापूस संबधित भेटवस्तू देण्यास सुरूवात केली. त्यामुळे स्थानिक उत्पादक, निर्यातदार एमएसएमई, महीला उद्योजक व बचत गटांची उत्पादने सर्वांसमोर येण्यास मदत झाली. नवीन निर्यातक्षम उत्पादने तसेच नव्या बाजारपेठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार मेळांव्यामध्ये सहभाग सक्षम करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्र, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, क्लस्टर डेव्हलपमेंट उपक्रम, सीड मनी प्रोग्राम आणि उदयोजकता विकास कार्यक्रम महत्वाचे ठरले. त्यामुळे खरेदीदार-विक्रेता अशी थेट साखळी तयार करण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT