कोकण

युवा गायकांनी रंगवली बहारदार शास्त्रीय मैफल

CD

- rat३p४.jpg -
२४M८७४८४
''स्वरस्नेह'' मैफलीत शास्त्रीय गायन करताना रोहन देशमुख, उत्तरा केळकर, शुची तळवलकर आणि तन्वी मोरे

युवा गायकांनी रंगवली शास्त्रीय मैफल

कलांगण, स्वराभिषेकचे आयोजन; उज्ज्वला पटवर्धन यांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : ज्येष्ठ संगीत समुपदेशक, संगीतकार वर्षा भावे यांचे शिष्य रोहन देशमुख आणि शुची तळवलकर (मुंबई) यांच्यासह येथील विनया परब यांचे शिष्य तन्वी मोरे आणि उत्तरा केळकर यांच्या बहारदार शास्त्रीय गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते कलांगण (मुंबई) आणि स्वराभिषेक (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ''स्वरस्नेह'' मैफलीचे.
शास्त्रीय गायन शिकणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळावे, तसेच शास्त्रीय गायनाची गोडी युवा पिढीला लागावी याकरिता कलांगण आणि स्वराभिषेक या संस्थांचे शिष्यवर्ग मुंबई आणि रत्नागिरी येथे ही मैफल सादर करतात.

या उपक्रमातील ही चौथी मैफल परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर पार पडली. रोहन देशमुख याने मुलतानी रागातील विलंबित एकतालात बद्ध ''ओ रब्बा मेंधीयाँ'' या बडाख्यालाने
मैफलीची सुरवात केली. त्यानंतर त्याने अब मानत नाही जियारा मोरा तूम बिन हा छोटा ख्याल आणि त्याला जोडून एक तराणा, त्यानंतर उत्तरा केळकर हिने बिहाग रागातील दुर्गे महारानी, तर शुची तळवलकर हिने मारुबिहाग रागातील ''परी मोरी नाव मजधारा रे दाता'' ही बंदिश सादर केली. तन्वी मोरे हिने जयजयवंती रागातील आणि झुमरा तालात बद्ध ''ए लरा माई सजनी'' हा बडाख्याल, त्याला जोडून ''झनन झनन बाजत पायल मोरी'' हा छोटा ख्याल सादर केला. तन्वीने विदुषी अलकाताई देव-मारुलकर यांनी बांधलेली ''अखियन कल ना पर माई'' ही मिश्रपिलू रागातील ठुमरी सादर करून मैफलीची सांगता केली. मैफलीचे निवेदन दीप्ती आगाशे यांनी केले, तर तबलासाथ प्रथमेश शहाणे, पुष्कर सरपोतदार आणि केदार लिंगायत, संवादिनीसाथ मंगेश मोरे आणि तानपुरासाथ मीरा सोवनी, ईशानी पाटणकर आणि ऋता पाटणकर यांनी केली.
मैफलीदरम्यान रत्नागिरीतील ज्येष्ठ संगीत शिक्षिका उज्ज्वला पटवर्धन यांना वर्षा भावे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. मैफलीला प्रसिद्ध संवादिनीवादक अनंत जोशी यांच्यासह अनेक मान्यवर, स्वराभिषेकचे विद्यार्थी, पालक यांच्यासह संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राकेश बेर्डे यांनी उत्तम ध्वनिसंयोजन केले, तर गगनगिरी महाराज आश्रमाचे राम पानगले यांनी मोलाचे सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Latest Marathi News Live Update : 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची एंट्री; प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनीच सांगितलं नाव

Ganesh Naik : १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरित व १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT