कोकण

पान एक-सिंधुदुर्गात सरीवर सरी

CD

88256
वैभववाडी : येथील पोलिस स्थानकासमोरील गटारातील पाणी महामार्गावरून वाहत होते.

सिंधुदुर्गात सरीवर सरी
मॉन्सूनसदृश वातावरण; गोव्याची वेस ओलांडण्याची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ : मॉन्सून गोव्यात दाखल झालेला असताना आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात दुपारपासूनच मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसू लागल्या. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक भागांत सरी बरसत होत्या. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मॉन्सूनसदृश वातावरण निर्माण झाले.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रातून मजल दरमजल करीत गोवा गाठले आहे. मंगळवारी (ता. ४) सायंकाळी मॉन्सून सिंधुदुर्गाजवळ असलेल्या गोव्यात दाखल झाला. आज दिवसभरात गोव्याचा काही भाग मॉन्सूनने व्यापला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मॉन्सून सिंधुदुर्गात दाखल होण्याची शक्यता आहे. गोव्यात मॉन्सून दाखल होताच आज सकाळपासूनच सिंधुदुर्गातील वातावरण बदलून गेले आहे. सकाळपासून पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची छाया जिल्ह्यावर पसरली होती. आज सकाळी साडेअकरापासून पूर्वमौसमीच्या सरी वैभववाडी तालुक्यातील बहुतांशी भागात बरसू लागल्या. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन सायंकाळी चारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी जोर वाढला. सरीवर सरी पडत होत्या. घाट परिसर आणि घाट पायथ्याच्या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. करूळ, भुईबावडा, नावळे, सडुरे, आदी भागांत जोरदार सरी कोसळल्या. कणकवली तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात देखील पावसाच्या सरी सुरू होत्या. कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांत देखील पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती या भागात होती. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. संपूर्ण जिल्ह्यात मॉन्सूनसदृश वातावरण तयार झाले होते.


मृगाचा मुहूर्त साधणार
मॉन्सून गोव्यात दाखल झाला असून, पुढील एक दोन दिवसांत सिंधुदुर्गात दाखल होण्याची अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मॉन्सून मृगाचा मुहूर्त साधण्याची देखील शक्यता आहे.

चौकट
गटारातील पाणी महामार्गावर
वैभववाडी शहरात काही गटारे खोदून ठेवली आहेत. त्यामध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पोलिस ठाण्यासमोर गटारातील पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्गावरून वाहत होते. या पाण्यामुळे वाहतुकीला देखील व्यत्यय येत होता. त्यामुळे शहरातील गटारांची साफसफाई होणार कधी आणि गटारातून पाणी जाणार कधी, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: सुंच आठ वर्षांपासून चालवत होता किडनी विक्रीचे रॅकेट; एका किडनीमागे सव्वा कोटी, मुलीच्या वडिलांनीही दिला होता नकार!

Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

Shukra Gochar 2026: वर्षाच्या पहिल्याच गोचरमध्ये ‘या’ राशींचं नशीब फुलणार, करिअरला मिळणार मोठी उंची

Vijay Hazare Trophy : पहिल्याच दिवशी २२ शतकं, गोलंदाजांची धुलाई; फलंदाजांनी मोडले अनेक विक्रम

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT