Accindet News sakal
कोकण

Accindet News: राजापुरात ट्रकने कार अन् दुचाकींना चिरडले; १ ठार, १० जखमी, ५ गंभीर

सकाळ वृत्तसेवा

Crime News: मुंबई-गोवा महामार्गावर गाडगीळवाडी येथील बस थांब्यानजीक गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्‍या कोळसावाहू ट्रकने या ठिकाणी उभ्या असलेल्या चार दुचाकी व मोटारीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये एक जण ठार झाला असून १० जण जखमी झाले आहेत.

यातील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविले आहे. सुदेश चंद्रकांत फाटक (वय ४५, रा. शेढे फाटकवाडी) असे मृताचे नाव आहे. बुधवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता भीषण अपघात झाला.

ट्रक उलटल्याने डिझेल टाकी फुटून डिझेल व ऑईल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक एका बाजूने वळविली होती. उतारावरून वेगाने घसरत येणारा हा ट्रक पाहून अनेक जण सैरावैरा पळू लागले. गोव्याकडून कोळसा भरून मुंबईकडे जाणारा हा चौदा चाकी मोठा ट्रक महामार्गावर गाडगीळवाडी येथील उतारावरून भरधाव आला. यावेळी बस थांब्यावर काही प्रवासी व काही दुचाकीस्वार थांबले होते. एक मोटारदेखील उभी होती.

भरधाव आलेल्या ट्रकने तेथे उभ्या असलेल्या चार दुचाकींना व मोटारीला उडवले. वेगाने ट्रक येताच तेथे उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांनी पळापळ केली. मात्र उभ्या असलेल्या सुदेश चंद्रकांत फाटक यांना जोरदार धडक बसल्याने ते जागीच ठार झाले तर अन्य काही प्रवाशी जखमी झाले.

या ट्रकने मोटारीला धडक दिल्याने मोटारमधील विकास रघुनाथ पाडावे, रघुनाथ भगवान पाडावे, रामदास लक्ष्मण दळवी, श्रावणी रामदास दळवी (सर्व रा. कणेरी) हे चौघे गंभीर जखमी झाले. उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये मिहिर मिलिंद धुळप (वय १३ रा. कोंढेतड) याच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

या पाचही जणांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, उपनिरीक्षक मोमीन शेख यांसह कर्मचाऱ्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना मदत केली व पंचनामा केला.

हे आहेत जखमी


किरकोळ जखमींध्ये ट्रक चालक अंबालाल श्रीरामजी बाट (४५), क्लीनर अस्‍लम खान (उदयपूर) या दोघांसह उभ्या असलेल्या प्रवाशांमधील रेश्मा दिगंबर फाटक, शुभ्रा प्रफुल्ल फाटक (रा. सर्व शेढे फाटकवाडी), सर्वेश उमेश सुर्वे (१८. रा. मुंबई सध्या रा. कोंढेतड) यांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मोहनिश शिवदे, डॉ. हर्षानी बुरानी यांसह कर्मचाऱ्‍यांनी तत्काळ उपचार केले.

अपघाताचे कारण अज्ञात


शहरालगत झालेल्या या अपघाची माहिती मिळताच अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतल्याने गर्दी झाली होती. मात्र हा अपघात कसा झाला याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. भरधाव आलेल्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला की कसा काय याचा पोलिस तपास करत आहेत.

गस्तीवरील पोलिस बचावले


अपघाताअगोदर काही क्षण राजापूर पोलिस ठाण्याच्या ११२ या गाडीचे चालक प्रसाद शिवलकर व पोलिस श्रीमती नीता वरक हे पेट्रोलिंगसाठी या भागात गेले होते. त्यांनी अपघात झाला त्या ठिकाणाच्या काही अंतरावरच गाडी उभी केली होती, योग्य अंतर ठेवून गाडी उभी केल्याने दोन्ही कर्मचारी बचावले आहेत. या दोघांनीही तत्काळ जखमींना बाहेर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT