कोकण

दमदार पावसाने कुडाळ जलमय

CD

88893

दमदार पावसाने कुडाळ जलमय

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः मृग नक्षत्र शुक्रवारी (ता. ७) सुरू झाल्याने जिल्ह्यात पावसाची एन्ट्री होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती; मात्र कोकणी लोकांना ‘मिरगा’चा आनंद लुटता आला नाही. अखेर एका दिवसानंतर म्हणजे आज पावसाची दमदार एन्ट्री झाली.
जिल्ह्यात आज दुपारी २ वाजल्यापासून सर्वदूर पाऊस झाला. या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले. कुडाळ शहरातील एस. आर. एम. चौक, काळप नाका येथे रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. मृगाचा पाऊस सुरू झाल्याने पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शेतीसाठी आवश्यक असणारा पाऊस झाल्याने नांगरणी, पेरणी या कामांना वेग येणार आहे. तळकोकणात मृग नक्षत्राला फार महत्त्व आहे. कोकणात याला ‘मिरग’ असे म्हटले जाते. मिरगाचा पहिला पाऊस पडला की, कोकणातला बळीराजा आपल्या शेतात जाऊन तिथल्या दैवतेला भक्तिभावाने हाक मारतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind vs Aus 5th T20 : आज अखेरचा टी-२० सामना, भारताला परदेशात आणखी एका मालिका विजयाची संधी, किती वाजता सुरु होईल सामना?

Indian Air Force Recruitment: भारतीय वायुदलात अधिकारी होण्याची संधी; AFCAT 1 2026 भरतीची अधिसूचना जाहीर

Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू; पुढील १०-१२ दिवसांत घोषणेची शक्यता

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपर्यंत कर्जमाफी, ऊस ठिबक सिंचनाला प्रतिटन शंभर रुपये अनुदान : कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे

Ajit Pawar : व्यवहारात पैशाची देवाणघेवाण नाही; पुणे जमीन कथित व्यवहारप्रकरणी अजित पवार यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT