कोकण

दाभोळ ः तालुक्यात ९७२१ विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तक

CD

तालुक्यात ९७२१ विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तक
पहिल्या दिवसाचे नियोजन ; १५ जूनपासून शाळा सूरू
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ९ : दापोली तालुक्यात शाळेच्या पाहिल्याच दिवशी ९ हजार ७२१ विद्यार्थ्यांना ४० हजार ५२२ पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. १५ जूनला शाळांची पहिली घंटा वाजणार असून याच दिवशी मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दापोलीचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी दिली आहे.
समग्र शिक्षा अभियानअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दापोली तालुक्यामधील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा व अनुदानित, अंशत: अनुदानित शाळेमधील १ ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना मराठी, उर्दू माध्यमासाठी तसेच सेमी इंग्रजीसाठी एकात्मिक स्वरूपात ४ भागांमध्ये प्राप्त झाली असून, ४० हजार ५२२ पुस्तके मिळाली असून त्यांची माध्यमनिहाय, केंद्रनिहाय विगतवारी पूर्ण करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील १ली ते ८वीच्या ९ हजार ७२१ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पुस्तके विभागनिहाय विगतवारी करण्यासाठी गट समन्वयक आर. वी. सांगडे तसेच तालुकास्तरीय बीआरसीमधील सर्व कर्मचारी, परिचर तसेच माध्यमिक शाळांमधील परिचर हे काम करत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सर्व केंद्रशाळांमध्ये ही पाठ्यपुस्तके रवाना करण्यात येणार असून केंद्रप्रमुख यांच्यामार्फत सर्व शाळांपर्यंत ती पोहोच करण्याचे नियोजन झाले आहे तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला असल्याची माहिती ही बळवंतराव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune News : बालगंधर्वच्या आवारात हॉटेलचे पार्किंग; हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला केले मॅनेज

Hyundai Salary Hike : ह्युंदाई कर्मचाऱ्यांना नवरात्रीची मोठी भेट, मिळाली 'इतक्या' हजारांची भरघोस पगारवाढ

SCROLL FOR NEXT