कोकण

गोंडे सखल रस्त्यावरील गटाराचे काम बंद

CD

- rat११p११.jpg-
P२४M८९३१९
लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी.

लांजा गोंडे रस्त्यावरील गटार काम बंद

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ; भाजप नगरसेवकांसह नागरिक आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ११ ः लांजा गोंडे सखल मार्गावरील गटाराचे काम बंद करावे यासाठी भाजपाचे गटनेते आणि नगरसेवक संजय यादव यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले तसेच गटाराचे काम बंद होत नाही तोपर्यंत कार्यालयातून ठाण मांडण्याचा इशारा दिल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून ते काम बंद करा, अशा सूचना ठेकेदाराला दिल्या.
लांजा गोंडे सखल मार्गावरील गटाराचे दुरुस्तीचे काम चालू आहे. ते गटार हॉटेल पर्यंत येत असल्यामुळे आणि त्या गटारांमध्ये हॉटेल व अन्य दुकानांचे सांडपाणी येण्याची शक्यता आहे. ते पाणी उलट्या दिशेने म्हणजेच भंडारी घर, आशीर्वाद बिल्डिंग, लांजा हेरिटेज बिल्डिंग, लांजा पॅलेस बिल्डिंग वणू घर इथपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे. त्याचा नागरिकांना त्रास होणार आहे. या सांडपाण्यामुळे दुर्गंधी, रोगराई, मच्छरांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे. हे पाणी व वणू घराच्या पुढे कुठेही जाण्याचा मार्ग नसल्यामुळे त्या पाण्याचा साठा परिसरात होऊन रोगराई पसरणार आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत हॉटेल्सचे सांडपाणी हे महामार्गाच्या दिशेने जात होते. ते वळवण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रशासन, सत्ताधिकारी यांच्याकडून होत आहे. तरी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जोपर्यंत या गटाराचे काम बंद होत नाही तोपर्यंत इथून कार्यालयातून जाणार नाही, असा पवित्रा नगरसेवक यादव आणि नागरिकांनी घेतला. त्यामुळे मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी संबंधित ठेकेदाराला दूरध्वनीवरून त्या गटाराचे काम बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वेळी नगरसेवक मंगेश लांजेकर, नगरसेविका वंदना काडगाळकर, नागरिक राहूल नारकर, भैरूलाल भंडारी, वणू, महेश नारकर व अन्य नागरिक उपस्थित होते.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT