कोकण

मनोहर कडू यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

CD

मनोहर कडू यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

‘भगवती एज्युकेशन’तर्फे मुणगेत कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १ ः येथील श्री भगवती हायस्कूलचे प्रयोगशाळा परिचर मनोहर कडू हे नियतवयोमानानुसार निवृत झाले. यानिमित्त त्यांचा सदिच्छा कार्यक्रम भगवती हायस्कूलचे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष हरी ऊर्फ नीलेश परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. श्री भगवती एज्युकेशन सोसायटी व भगवती हायस्कूलतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष हरी परुळेकर, शालेय समिती सदस्य व माजी मुख्याध्यापक संजय बांबुळकर, नंदकुमार बागवे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, सेवानिवृत्त शिक्षिका प्रेमलता परुळेकर, सहाय्यक शिक्षिका गौरी तवटे, सत्कारमूर्ती मनोहर कडू व सौ. कडू, भरत सावंत, मनीषा खानोलकर, प्रशालेचे सहाय्यक शिक्षक एन. जी. वीरकर, रश्मी कुमठेकर, प्रसाद बागवे, हरिदास महाले, स्वप्नील कांदळगावकर, लिपिक नामदेव बागवे, ग्रामस्थ सुरबा सावंत आदी उपस्थित होते. यावेळी कडू यांना परुळेकर यांच्या हस्ते भेटवस्तू, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. सौ. कडू यांचाही सत्कार केला. परुळेकर यांनी मनोगतात कडू यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संजय बांबुळकर, शिक्षक प्रसाद बागवे यांनी मनोगते व्यक्त केली. सत्कारमूर्ती कडू यांनी संस्थेचे ऋणी असल्याचे सांगून आठवी, नववी व दहावीच्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांसाठी रक्कम देणगी दिली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका एम. बी. कुंज यांनी प्रास्ताविक केले. गौरी तवटे यांनी सूत्रसंचालन केले. रश्मी कुमठेकर यांनी आभार मानले.
93996

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT