कोकण

देवरूख-कुडवली बसफेरी सुरू

CD

देवरूख-कुडवली
बसफेरी सुरू
देवरूखः देवरूख- कुडवली बसफेरी गेल्या काही महिन्यांपासून रस्ता खराब असल्यामुळे बंद होती. त्यामुळे येथील विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होत होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे कार्यकर्ते सचिन जाधव, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, देवरूख शहराध्यक्ष नीलेश भुवड यांनी यासाठी पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे आजपासून या मार्गावर देवरूख-कुडवली ही फेरी सुरू केली आहे. ही फेरी सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. सध्या देवरूख-कुडवली रस्त्याचे काम सुरू आहे; मात्र वाहतुकीसाठी हा मार्ग सुस्थितीत आहे. त्यामुळे एसटी फेरीच्या मागणीनंतर रविवारी एसटी प्रशासनाने या मार्गाची प्रथम पाहणी केली आणि सोमवारपासून ही फेरी सुरू केली आहे. ही फेरी सुरू करण्यासाठी कुडवली येथील सचिन जाधव यांनी प्रथम धामापूरतर्फे देवरूख ग्रामपंचायतशी संपर्क साधत तेथे ही समस्या मांडली. यासाठी ग्रामपंचायतीनेही सहकार्य दाखवत बसफेरी सुरू करण्याबाबत मागणीचे निवेदन दिले. या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. पाटगाव, पूर, कुडवली बौद्धवाडी, नवेलेवाडी, मठधामापूर आदी ठिकाणच्या ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची या फेरीमुळे गैरसोय दूर झाली.
--------
घनकचरा निर्मुलनसाठी
राखीव जागेची मागणी
रत्नागिरी : कुवारबाव ग्रामपंचायतीच्या घनकचरा निर्मुलन प्रकल्पासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यामागील राखीव जागेची मागणी केली आहे. सुमारे ८७ गुंठे जागेपैकी काही जागा मिळावी यासाठी २५ मार्च २०२३ ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ३१ ऑक्टोबर २०२३ च्या पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कुवारबाव ग्रामपंचायतच्या घनकचरा प्रकल्पासाठी द्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे कार्यवाही अपेक्षित होती; परंतु जिल्हा प्रशासन तांत्रिक बाबी उपस्थित करून कागदी घोडे नाचवत आहे. जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांकडून ११ जून २०२४च्या पत्राद्वारे त्या जागेचा अभिप्राय मागवला आहे. हा विषय लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
--------
लांजा तालुक्यातील
ग्रामपंचायतीत शिबिर
लांजाः येथील तहसील कार्यालयात होणारी गर्दी लक्षात घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तातडीने महा-ई-सेवा केंद्र आणि ग्रामपंचायतीत शिबिरे घेण्याचे निश्चित केले आहे. लांजा येथील नगरसेवक आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी राजेश हळदणकर यांनी लांजा तहसीलदार यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शिबिर घेण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते. त्याची तातडीने तहसीलदार कदम यांनी दखल घेऊन या संदर्भात महा-ई-सेवा केंद्र आणि ग्रामपंचायत शाळा येथे उत्पन्नाचा दाखला अर्ज भरण्यासंदर्भात शिबिरे घेतली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT