कोकण

विद्यार्थ्यांनो, व्यसनांपासून दूर राहा

CD

विद्यार्थ्यांनो, व्यसनांपासून दूर राहा

निसर्ग ओतारी ः दोडामार्ग हळबे महाविद्यालयात व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३ : शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी व्यसनाकडे वळू नये. व्यसनांपासून दूर राहा, शिका, मोठे व्हा व देशाचे नाव उज्वल करा, असे आवाहन दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले.
यावेळी त्यांनी अमली पदार्थांचे सेवन करणे, जवळ बाळगणे व त्यांची विक्री केल्यास कोणत्या प्रकारची कारवाई होते, याची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहाण्याचा सल्ला दिला. येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पोलिस ठाणे दोडामार्ग यांच्यावतीने अमली पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून अमली पदार्थ सेवनाची कारणे, दुष्परिणाम व त्यावर शासनाची व स्वयंसेवी संस्थांची, शाळा-महाविद्यालयांची भूमिका यावर दोडामार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी विविध अमली पदार्थांची माहिती सांगून ती सेवन केल्यास, जवळ बाळगल्यास व विक्री केल्यास कोणती शिक्षा केली जाते, याची सविस्तर माहिती दिली. तरुणांनी चांगला अभ्यास करून चांगला व्यवसाय किंवा नोकरी करावी, कोणत्याही व्यसनाला बळी पडू नये. शिक्षण घेत असताना मित्रांच्या संगतीने व्यसन लागू शकते. त्यापासून दूर राहा, शिका, मोठे व्हा व देशाचे नाव उज्वल करा, असे प्रोबोधित केले. त्यांनी व्यसनमुक्तीवर कविता सादर करून त्यातून जागृती करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या नवीन कायद्यांविषयी माहिती दिली. प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान जाधव, कसई-दोडामार्गचे नगरसेवक तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. संजय खडपकर, पोलिस हवालदार तथा माजी विद्यार्थी समीर सुतार, हवालदार विजय जाधव आदी उपस्थित होते. डॉ. खडपकर यांनी सूत्रसंचालन केले. साक्षी गवस हिने आभार मानले.
94537

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Latest News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगात हत्या? ; भेटायला गेलेल्या बहिणींना झाली मारहाण!

Stock Market Today : शेअर बाजार रेकॉर्डच्या उंबरठ्यावर, सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील महिलेने केला पुरुषावर अत्याचार

एकदम झापूक झूपूक स्टाइल! सुरज चव्हाणचं लग्नाआधी कडक प्री- वेडींग; फोटो पाहिलेत का?

Navi Mumbai News: विमानतळाला ३ नवे उड्डाणपूल जोडणार, ठाणे–बेलापूर रस्ता नव्या रुपात झळकणार; नवीन मार्ग कसे असणार?

SCROLL FOR NEXT