कोकण

‘लाडकी बहीण’ शिबिराला आचऱ्यात महिलांचा प्रतिसाद

CD

‘लाडकी बहीण’ शिबिराला
आचऱ्यात महिलांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ७ ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी भाजप आचरा विभागातर्फे आयोजित विशेष शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आचरा गावात ग्रामपंचायत आचरा गाऊडवाडी आणि आचरा तिठा वरचीवाडी अशा दोन ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यासाठी मोफत झेरॉक्स सुविधाही उपलब्ध करुन दिली होती. या शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आचरा तिठा येथील शिबिर यशस्वीतेसाठी सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, मनोज हडकर, सिद्धार्थ कोळगे, महेश मेस्त्री, रुपेश परब, ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोक कांबळी, लक्ष्मण आचरेकर, लक्ष्मण बापर्डेकर, सुगंधा गुरव, मनाली फाटक आदींनी विशेष प्रयत्न केले. ग्रामपंचायत येथे भाजपचे राजन गावकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, माजी उपसरपंच पाडुरंग वायंगणकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुरेश गावकर, जे. एम. फर्नांडिस, श्री. शेट्ये, पोलिसपाटील जगन्नाथ जोशी आदींनी विशेष मेहनत घेतली. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच फर्नांडिस, राजन गावकर यांनी केले आहे.
95357

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी एवढे काम करतो, पण खंत आहे की गालबोट का लागतं?' अजित पवारांना कायम असणारी खंत | Ajit Pawar Passed Away | Sakal News

India-Arab Foreign Ministers Meet : इस्लामिक राष्ट्रांच्या नेत्यांना एकाचवेळी दिल्लीत बोलवण्यामागे मोदी सरकारची रनणीती काय?

World Record: आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने मोडला हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20 ती मोठा विक्रम आयरिश फलंदाजाच्या नावावर

Car Accident : दोन कारच्या धडकेत चार ठार; अमरावती-दर्यापूर मार्गावरील सायत गावाजवळ घडली घटना

Forest Department : कराड शहरात वाघाचे अस्तित्व? नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न, वन विभागाकडून एकावर गुन्हा

SCROLL FOR NEXT