कोकण

देवरुख न्यू इंग्लीश स्कूल जिल्हास्तरावर द्वितीय

CD

- rat७p१०.jpg-
P२४M९५३१७
देवरुख न्यू इंग्लीश स्कूलला ५ लाखांचा धनादेश

देवरुख न्यू इंग्लीश स्कूलचा जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक

माझी शाळा, सुंदर शाळा ; ५ लाखांचा धनादेश प्राप्त झाला.

सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता.८ : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात देवरुख न्यू इंग्लीश स्कूलला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून त्या शाळेला ५ लाखांचा धनादेश प्राप्त झाला आहे.
शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्या योगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचे मूल्यमापन केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय पातळीवर करण्यात आले. तालुकास्तरावर शाळेने ३ लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवले. या कालावधीत केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवरील तपासणी पथक यांनी वेळोवेळी शाळेला भेट देऊन स्पर्धात्मक अभियानाच्या निकषानुसार शाळेतील विविध उपक्रम, कार्यालयीन दप्तर, भौतिक सुविधा यांची तपासणी करून एकूणच शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व मुल्यांकन निकषांनुसार गुणदान करण्यात आले होते. या मुल्यांकन निकषांनुसार जिल्हास्तर पातळीवरील स्पर्धेत आपल्या न्यू इंग्लिश स्कूल देवरूख प्रशालेला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला व पाच लाख रुपये बक्षीस रूपाने शासनाकडून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.त्याप्रमाणे प्रशालेला पाच लाख रुपयांचा धनादेश प्राप्त झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात जसे स्वच्छता मॉनिटर, स्वच्छता दूत म्हणून शाळा परिसर व देवरूख शहर परिसर स्वच्छता यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून उत्कृष्टपणे नियोजनाप्रमाणे जबाबदारी पार पाडली. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सदानंद भागवत, शाळा समिती अध्यक्ष नेहा जोशी, शिरीष फाटक यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Department: तीन महिने काम अन् तीन महिने घरी थांब; आयकर विभागाचे अफलातून कंत्राटी धोरण, कर्मचारी जगताहेत आश्‍वासनाचा ‘श्‍वास’ घेऊन

‘रा वन’ पुन्हा जिवंत होणार? शाहरुख खानने दिला सीक्वेलचा हिंट

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर, विमानतळावर आगमण

November 2025 Travel: जयपूर ते वाराणसी; या महिन्यात भारतातील 5 अद्भूत ठिकाणांना द्या भेट

Pune Smart Toilet : पुणे मनपाचा नवा प्रयोग; फिनिक्स मॉलजवळ शहरातले पहिले AC 'स्मार्ट टॉयलेट' सुरू, महापालिकेला खर्च नाही

SCROLL FOR NEXT