कोकण

राजन साळवी लेख

CD

राजकीय पार्श्वभूमी ः

भारतीय विद्यार्थीसेना या संघटनेचे काम महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पाहिले व त्या वेळी समाजसेवेचे बाळकडू वरिष्ठ सहकारी, मार्गदर्शक तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्‍यांकडून प्राप्त झाल्याने राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. भूमिअभिलेख कार्यालय, रत्नागिरी येथे वरिष्ठ लिपिक या पदाचा राजीनामा देऊन राजकारणामध्ये पाऊल टाकले. राजकारणामध्ये शिवसेना या संघटनेच्या माध्यमातून सक्रिय झाल्यानंतर रत्नागिरी शहरामध्ये शाखाप्रमुख व नंतर सलग तीनवेळा प्रभाग राखीव झाल्याने वेगवेगळ्या प्रतिकूल प्रभागातून मोठ्या मताधिक्क्याने नगरसेवक होण्याचा मान प्राप्त. नगर पालिकेमध्ये शिवसेना-भाजप अल्पमतात असूनही रत्नागिरी व शिवसेनेच्या इतिहासामध्ये शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

नगराध्यक्ष पदाच्या यशस्वी कारकीर्दीमध्ये रत्ननगरीमध्ये सिग्नल यंत्रणा, स्वा. वि. दा. सावरकर या रत्नागिरीसाठी भूषण ठरलेल्या नाट्यगृहाच्या कामाचा शुभारंभ. या वेळी तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडून या वैभवशाली नाट्यगृहाच्या संकल्पनेसाठी गौरव.

नगराध्यक्ष पदाची कारकीर्द संपल्यानंतर इतरांना संधी देण्याच्या हेतूने नगर पालिका निवडणूक न लढविण्याचा निर्णय; परंतु, पक्षाकडून कामाची आक्रमक कार्यपद्धती पाहून आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिवसेना जिल्हाप्रमुख हे जबाबदारीचे पद देऊन कामाप्रती समाधान. शिवसेना जिल्हाप्रमुख या आत्यंतिक महत्वाच्या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे सातही विधानसभा मतदार संघातून युतीचे आमदार निवडून आणण्यात निर्णायक भूमिका, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील बहुतांशी पंचायत समित्या, नगर पालिका, ग्रामपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व राखले.

आयुष्यातील अविस्मरणीय घटना

शिवसेना जिल्हाप्रमुख या पदाच्या कारकीर्दीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून १ लाख २५ हजार इतकी शिवसेनेची सभासद नोंदणी केल्याबद्दल २००४ ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जागतिक स्तरावर गौरविलेल्या शिवाजीपार्क, दादर येथील दसरा मेळाव्यामध्ये लाखोंच्या जनसमुदायासमोर देशातील शिवसेनेचा अद्वितीय जिल्हाप्रमुख म्हणून सन्मानाची ढाल देऊन झालेला सत्कार.

शिवसेनेचा सलग पाच वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून लक्षवेधी कारकीर्द

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातून सलग तीनवेळा आमदार

सांस्कृतिक ः राजापूर तालुक्यामध्ये तरुणाईला साद घालणारा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्‍या जिल्ह्यातील बहुचर्चित युवागंगा महोत्सवाचा शुभारंभ.

शैक्षणिक ः शिवसेनाप्रमुख व शिवसेना कार्यप्रमुख यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून दरवर्षी ग्रामीण व शहरी शालेय विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश व शालेय साहित्यांचे वाटपांचा उपकम

वैद्यकीय ः स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे, शिवसेनाप्रमुख व शिवसेना कार्यप्रमुख यांच्याही वाढदिनाचे औचित्य साधून दरवर्षी मतदार संघामध्ये रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यांचे आयोजन

सामाजिक ः जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर २४ तास गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून असंख्य जीवांचे प्राण वाचवताना चालू असलेली अहोरात्र सेवा ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर रत्नागिरीवासियांसाठी अव्याहतपणे चालू आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिनाचे औचित्य साधून दरवर्षी महामृत्यूंजय यज्ञ, श्री सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, महाराष्ट्राची मराठमोळी परंपरा जपणाऱ्‍या मनोरंजनात्मक कार्यकमाचे आयोजन करून सामाजिक ऐक्य राखण्यावर जाणीवपूर्वक भर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT