कोकण

सिंधुदुर्गात अतिवृष्टीने नुकसान सत्र

CD

95780
95797

सिंधुदुर्गात पावसाचे नुकसान सत्र सुरूच
पंचनाम्याचा प्राथमिक अहवालः ओरोस, कसाल, बांबार्डे, पावशी, बांद्याला फटका
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सत्र सुरु झाले आहे. याचे पंचनामे सुरु झाले आहेत. सर्वाधिक फटका खारेपाटण, कसाल, ओरोस, बाबार्डे, पावशी, बांदा या भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १४४०.४० हेक्टर भातशेती क्षेत्र बाधित झाले आहे. यात ३३३२ शेतकऱ्यांना फटका बसला असून एकूण १५८ गावे बाधित झाली आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय कुमार राऊत यांनी दिली. तसा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविला असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
जिल्ह्यात काल (ता. ७) अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला होता. जिल्ह्यातील तेरेखोल नदीने अद्यापही इशारा पातळी ओलांडली आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून सुमारे बावीस लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, यात ओरोस ख्रिश्चनवाडी येथील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाही. त्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच सध्या ३६६ नागरिकांना पुरापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील असंख्य मार्ग बंद झाले होते. जिल्ह्यातील सर्वच नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. ओरोस ख्रिश्चनवाडी, बांबार्डे आणि पावशी येथील राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद होती. पावशी येथील पाणी सकाळपर्यंत राहिल्याने सकाळनंतर येथील राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक सुरू झाली होती.
सावंतवाडी तालुक्यात पावसाने सर्वाधिक २७० मिलीमीटर एवढी बॅटिंग केली आहे. तसेच ३४२ मिलीमीटर एवढा सर्वाधिक पाऊस मडूरा भागात पडल्याचे तेथील पर्जन्यमापक केंद्रात नोंद झाला आहे.
झालेले नुकसान असेः दोडामार्ग-कसई येथे पाच घरांचे अंशतः दोन लाख १४ हजार ५०० रुपये, मणेरी चार घरांचे ८४ हजार, तळकट एका घर १० हजार, कळणे एक घर ३० हजार, आयी एक घर १५ हजार, झरे एक घर १५ हजार, घोटगेवाडी एक घर चार हजार, माटणे एक घर पाच हजार. सावंतवाडी ः बावळाट एक घर पाच हजार, आंबोली येथील म्हैस वाहून गेल्याने ३० हजार रुपयांचे नुकसान. कुडाळ ः कसाल, पांग्रड, आंब्रड येथील प्रत्येकी एका घराचे अंशतः तर कुंदे येथील पोल्ट्री फार्ममधील तीन हजार कोंबड्या वाहून गेल्या. यामुळे तीन लाख रुपयांचे नुकसान. कणकवली ः बोर्डवे भाकरवाडी येथील एक घराचे अंशतः दोन लाख १६ हजार ५००, शिवडाव एक घराचे ४५००, घोणसरी एक घर सहा हजार, भिरंवडे एक घर १९ हजार ३५०, शेर्पे एक घर पाच हजार, कलमठ गुरववाडी येथील बारा घरांचे ८० हजार, कलमठ लांजेवाडी तीन घरांचे २० हजार. देवगड ः शिरगाव एका घर ४० हजार, दाभोळे चार घरांचे ४८ हजार, मालपेवाडी एक घराचे ३० हजार, किंजवडे घराची संरक्षक भिंत कोसळून २ लाख, जामसंडे दोन घरे दोन लाख ४० हजार, तोरसोळे येथील एका घराचे ५० हजार तर हिंदळे येथील एका घरात पाणी घुसून ३७ हजार ६५० रुपये. वैभववाडी ः वाभवे येथील एका घराचे चार हजार, पालांडेवाडी येथील एका घराचे २० हजार, मेहबूबनगर येथील दोन घरांचे २० हजार, नाधवडे येथील एका गोठ्याचे तीन हजार, कुर्ली येथील एका घराचे सात हजार, टेंबवाडी येथील एका घराचे सात हजार. मालवण ः मसुरे देऊळवाडा येथील एका घराचे ८० हजार, हिवाळे येथील दुकानात पाणी शिरून ५० हजार, सुकळवाड येथील घरातील खत, इतर साहित्य यांचे ९ हजार, कांदळगाव येथील एका घराचे ११ हजार आणि कुमामे येथील गणपती कारखान्याचे दोन लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray: कोण होत्या मीनाताई ठाकरे? बाळासाहेबांच्या झंजावात राजकारणात होता सिंहाचा वाटा

Nagpur Municipal Corporation: 'नागपूर मनपा निवडणुकीला महागाईचा फटका'; २० कोटींचा अंदाजित खर्च, २४ लाखांहून अधिक मतदार

Nano Banana AI Durga Puja 2025 Saree Look Prompts: 'हे' 5 प्रॉम्प्ट कॉपी करा अन् जनरेट करा फेस्टिव्हल साडी लूक

Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसी पोलिसांचा पर्यावरणासाठी पुढाकार, देशी वृक्षांची लागवड

Mumbai Local Viral Video: दिव्यांगजन कोचमध्ये सामान्य प्रवाशांची घुसखोरी, आरक्षित डब्ब्यात चढण्यासाठी दृष्टिहीनांचे हाल

SCROLL FOR NEXT