कोकण

राजापुरातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

CD

- rat१०p६.jpg-
P२४M९६०९०
राजापूर ः पेढ्यांची तुला केल्यानंतर साऱ्यांना अभिवादन करताना शिवसेनेचे उपनेते आणि आमदार डॉ. राजन साळवी. या वेळी उपस्थित माजी आमदार हुस्नबानू खलिफे, शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक आणि मान्यवर.
- rat१०p७.jpg-
P२४M९६०९१
राजापूर ः कार्यक्रमाला उपस्थित शिवसैनिक, पदाधिकारी.

राजापुरातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

आमदार साळवी यांचा वाढदिवस विविध उप्रकमानी साजरा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० : शिवसेनेचे उपनेते आणि आमदार डॉ. राजन साळवी यांचा वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे राजापूर येथे पेढ्यांची तुला करण्यात आली. या प्रसंगी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील यश संपादित केलेले विद्यार्थी यांचा आमदार साळवी, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर, अनुजा राजन साळवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, उपतालुकाप्रमुख तात्या सरवणकर, शहरप्रमुख संजय पवार, अ‍ॅड. शशिकांत सुतार, विभागप्रमुख संतोष हातणकर, नरेश शेलार, अभिजीत तेली, अभय मेळेकर, विनय गुरव, प्रसाद मोहरकर, योगेश नकाशे, उमेश पराडकर, नरेश दुधवडकर, वसंत जड्यार, कल्याणी रहाटे, शरद लिंगायत यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आमदार साळवी यांनी जनतेने भरभरून दिलेले प्रेम अन् निवडून देत सर्वसामान्य शिवसैनिकाला आमदार केल्याबद्दल साऱ्‍यांना धन्यवाद दिले तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांनी दाखवलेला विश्‍वास आणि दिलेला आशीर्वाद याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमदार साळवी यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, शिवसैनिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनी गर्दी केली होती.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT