कोकण

निता बोढरे ठरल्या सर्वाधिक पुरस्कार विजेत्या शिक्षिका

CD

-rat१p२१.jpg-
P२४N१५३५९
नीता बोढरे
-------------
नीता बोढरेंना सर्वाधिक पुरस्कार प्राप्त

शिक्षण परिषदेची व्हिडिओ निर्मिती स्पर्धा; मंडणगड तालुक्याचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १ ः दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत म्हाप्रळ शाळेच्या उपशिक्षिका नीता वाल्मिक बोढरे-दारूंटे यांनी यश संपादन केले. संपूर्ण राज्यात सर्वाधिक बक्षीस मिळवलेल्या स्पर्धक शिक्षिका म्हणून त्यांचा गौरव झाला आहे.
शिक्षण परिषदेने शालेय शिक्षणाचा दर्जा वाढावा व शाळेत गुणवंत विद्यार्थी घडावेत या अनुषंगाने सहा गटांमध्ये २८ विषयांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. पहिली ते दुसरीमध्ये भाषा, गणित, इंग्रजी; तिसरी ते पाचवी भाषा, इंग्रजी, परिसर अभ्यास; सहावी ते आठवी भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे; नववी ते दहावी भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांची परीक्षा झाली. यामध्ये तिसरी ते पाचवी परिसर अभ्यास हा विषय वगळता तालुकास्तरावर उर्वरित १५ विषयात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय स्पर्धेत सात प्रथम क्रमांक, तीन द्वितीय क्रमांक व सहा विषयात तृतीय क्रमांक मिळवले आहेत. स्पर्धेतील सर्वच्या सर्व म्हणजे २८ विषय विभागांमध्ये सहभागी होणाऱ्या त्या एकमेव स्पर्धक शिक्षिका आहेत. याचबरोबर तालुक्यातील पंदेरी शाळेचे शिक्षक मेघराज पवार व पडवे शाळेचे शिक्षक युवराज पवळे या दोघांनाही तिसरी व पाचवीच्या परिसर अभ्यासात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Khadakwasla Dam : ‘खडकवासल्या’त सर्वोच्च पाणीसाठा, तेरा वर्षांतील उच्चांकी; धरणक्षेत्रात पावसाचा दिलासादायक परिणाम

Viral Video: रशियन महिलेने प्राणी संग्रहालयात नको ते कृत्य केलं... पाहणारे ही संतापले, व्हिडिओ व्हायरल

UPSC 2024 : ‘यूपीएससी’तील यशस्वितांचा गौरव; प्रशासकीय सेवेत आवड महत्त्वाची : माजी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

SCROLL FOR NEXT