कोकण

आंबेशेत घोसाळेवाडीत २१ मार्चला भव्य पालखी नृत्य स्पर्धा

CD

आंबेशेत घोसाळेवाडीत
शुक्रवारी पालखी नृत्य स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : शहराजवळील आंबेशेत घोसाळेवाडी येथे सालाबाद प्रमाणे शिमगोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २१ मार्चला हा उत्सव साजरा होत आहे. पालखी नृत्य स्पर्धा हे या शिमगोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या पालखी नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट पालखी नृत्य पारितोषिक म्हणून प्रथम क्रमांकाचे २१ हजाराचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. शिमगोत्सवानिमित्त प्रत्येक गावची ग्रामदेवता भक्तांच्या भेटीला मंदिरातून बाहेर पडली आहे. या निमित्त गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आंबेशेत येथील घोसाळेवाडी येथे देखील मागील अनेक वर्षे शिमगोत्सवात पालखी नृत्य उत्सवाचे आयोजन करण्याची परंपरा जोपासली गेली आहे.
या वर्षी २१ मार्चला हा पालखी नृत्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिवशक्ती मित्रमंडळ रत्नागिरी आंबेशेत घोसाळेवाडी यांच्याकडून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो भाविक या पालखी उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी घोसाळेवाडी आंबेशेत येथे हजेरी लावतात. या वर्षी पालखी नृत्य पारितोषिक देण्यात येणार आहे. या नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक २१००० व चषक, द्वितीय १५००० व चषक, तृतीय ११००० रोख बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. या पालखी नृत्य स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्या मंडळांनी नियम व अटी जाणून घेण्यासाठी अनिल घोसाळे, अमोल घोसाळे, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Rain : इतिहासात पहिल्यांदाच सीना नदीला महापूर, विक्रमी विसर्ग; २६ गावांमध्ये शिरलं पाणी

Marathwada Rain Update : मराठवाड्याला अतिवृष्टीने रडवलं, शेतीचं प्रचंड नुकसान; सोलापूर-बीडमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी

Google Gemini Garba Trend: नवरात्रीसाठी गरबा आणि दांडिया लूक तयार करण्यासाठी बेस्ट प्रॉम्प्ट जाणून घ्या

Maharashtra Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज वादळी पावसाची शक्यता, IMD कडून अलर्ट जारी

Navratri In Kolhapur : श्री. अंबाबाईची पूजा कमलालक्ष्मी रुपात, कसा असतो कोल्हापूरचा नवरात्रोत्स? रोज रात्री पालखी सोहळा...

SCROLL FOR NEXT