कोकण

रत्नागिरी ः नाटकांसाठीच्या योगदानाचा सन्मान

CD

rat28p6.jpg-
54013
रत्नागिरीः अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या जागतिक रंगभूमीदिनात ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. सुजन शेंडे यांचा सत्कार करताना मान्यवर.

नाटकांसाठीच्या योगदानाचा सन्मान
अजित पाटील; नाट्य परिषदेतर्फे जागतिक रंगभूमीदिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ः गेली अनेक वर्षे दुचाकी घेऊन अगदी दुर्गम गावापर्यंत गेलो. आज हा सगळा प्रवास आणि नाटकांना दिलेल्या योगदानाचा सन्मान आहे. नाट्यप्रवासात कायमच सहकाऱ्यांनी मदत केली. आता थांबायचे नाही, रंगभूमीसाठी काम करत राहायचे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अजित पाटील यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त उत्सवी रंगभूमीवर काम करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात नटराजपूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी गायक राकेश बेर्डे यांनी कराओकेच्या माध्यमातून गणेशस्तवन सादर केले. त्यानंतर ज्येष्ठ रंगकर्मी दत्तोपंत खेबूडकर, वसंत पवार, सुधाकर बेहरे, सुधाकर भावे, भाऊ शेट्ये, जोग, श्रीकांत मुकादम, अनुया बाम यांच्यासमवेत अभिनय साकारणाऱ्या आणि स्पर्धात्मक रंगभूमीवर काम करणाऱ्या मराठीच्या निवृत्त प्राध्यापिका सुजन शेंडे यांचा नाट्यपरिषदेतर्फे सन्मान करण्यात आला. या प्रसंगी त्या म्हणाल्या, नाटकाचा छंद जोपासताना अनेक दिग्गज मंडळींबरोबर काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. मराठी भाषेविषयी कुणी गळे काढू नयेत. मराठीत व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे; पण हिंदीत तो पुल्लिंगी वापरला जातो. मराठी भाषा आपण जगवलीच पाहिजे.
या वेळी सारथा गवाणकर हिने पंचतुंड नररूंडमालधर ही नांदी कराओकेच्या माध्यमातून सादर केली. शांभवी सनगरे, सौमिनी भावे यांनी रेकॉर्ड डान्स केला. उत्सवी रंगभूमीवर अनेक वर्षे कार्यरत असलेले शहराजवळील बसणी येथील ज्येष्ठ रंगकर्मी अजित पाटील यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी अनुया बाम आणि श्रीकांत पाटील यांनी लेखक जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ‘नातीगोती’ या संहितेतील एका भागाचे वाचन केले. त्यानंतर अभिनेता सचिन काळे यांनी स्वलिखित एक कविता सादर करून रसिकांना भारावून सोडले. राजू जाधव, मया रावणंग, सचिन लांजेकर, माजी कृषी अधिकारी विजय पोकळे यांनी करोओकेच्या माध्यमातून गीते सादर केली. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या या जागतिक रंगभूमी दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटककार अमेय धोपटकर यांनी अगदी ओघवत्या शैलीत केले. या वेळी राजकिरण दळी, लेखक अनिल दांडेकर, मनोहर जोशी, श्रीकांत पाटील, आप्पा रणभिसे, विनयराज उपरकर, योगेश सामंत, रक्षिता पालव, सनातन रेडिज, विजय पोकळे, संतोष सनगरे, सचिन काळे, चंद्रकांत कांबळे, दीपक कीर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Nagaradhyaksha Results 2025 : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये कुणी मारली बाजी? कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष? वाचा संपूर्ण यादी

Crime: धक्कादायक! अनेक तरुणींसोबत तब्बल लग्नाची रात्र ५५ वेळा साजरी; वधूसोबत नको ते कृत्य, एका वराची हादरवणारी कथा

Vijay Hazare Trophy: ऋतुराज गायकवाड कर्णधार, पृथ्वी शॉही महाराष्ट्र संघात; पहिल्याच सामन्यात शुभमन-अभिषेकच्या संघाला भिडणार

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?

Latest Marathi News Live Update: विजय जल्लोष मिरवणुकीवेळी लागली मोठी आग

SCROLL FOR NEXT