कोकण

आंगलेतील चंडिका देवीची प्रतिष्ठापना १३ रोजी

CD

चंडिका देवीची मंगळवारी प्रतिष्ठापना
आंगलेत विविध कार्यक्रम ; १५ रोजी सांगता
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः तालुक्यातील आंगले येथील श्री देवी चंडिका श्री ब्राह्मणदेव श्री देव रामेश्वर ट्रस्ट व आंगले ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १३ ते १५ मे या कालावधीत स्वामी श्री गगनगिरी महाराज योगाश्रमचा जीर्णोद्धार सोहळा आणि श्री चंडिका माता मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन केले आहे.
आंगले गावातील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज योगाश्रम जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा १३ आणि १४ मे रोजी ग्रामदेवता श्री चंडिका देवी मूर्ती प्रतिष्ठापना प्रथम वर्धापनदिन सोहळा १५ मे रोजी आयोजित केला आहे. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गगनगड विश्वस्त संजयसिंह दादा पाटणकर, रमेश माने, स्वामी गगनगिरी महाराज आश्रम ओणी मठाधिपती उल्हासगिरी महाराज यांच्यासह श्री शंभू पंचदशनाम जुना अखाडा नील पर्वत त्र्यंबकेश्‍वर येथील मठाधिपती आझादगिरी महाराज, किटाचे रान दाजीपूर मठाधिपती, झांजूचे पाणी, दाजीपूरचे मठाधिपती दीपकगिरी महाराज, सैतवडे आश्रम गगनबावडाचे मठाधिपती उंबरगिरी महाराज, बुरंबाळी आश्रमचे मठाधिपती सदानंदगिरी महाराज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी १३ मे रोजी सकाळी गणेशपूजन पुण्याहवाचन, देवतास्थापना होमहवन, जलाधिवास, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री जगन्नाथ मंदिर, कळसवलीचे प्रवचनकार विश्वेश्वर दास यांचे प्रवचन, स्थानिक भजने, रात्री महाप्रसाद, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम तर १४ मे रोजी सकाळी पुण्याहवाचन मूर्ती स्थापना, कलश मिरवणूक, साधूसंतांच्या हस्ते कलशारोहण, महाआरती, साधूसंतांचे पूजन, सत्कार सोहळा व मार्गदर्शन, महाप्रसाद, स्थानिक सूस्वर भजने, महाप्रसाद, देवगड किंजवडे येथील श्री पावणाई समई नृत्य व १५ मे रोजी सकाळी ग्रामदेवता श्री चंडिका देवी मूर्ती अभिषेक, श्री सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, हळदीकुंकू, महाप्रसाद, श्री ग्रामदेवता चंडिका देवी तसेच स्वामी गगनगिरी महाराज पालखी मिरवणूक, सायंकाळी स्थानिक भजने, रात्री महाप्रसाद, सत्कार समारंभ, कणकवली येथील श्री दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ कासार्डेचे बुवा प्रकाश पारकर आणि देवगडचे श्री ब्राह्मदेव प्रासादिक भजन मंडळ बापर्डेचे बुवा संदीप नाईक धुरे यांचा डबलबारी भजन असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी चंडिका श्री ब्राह्मण देव, श्री देव रामेश्वर ट्रस्ट, आंगलेचे व्यवस्थापक व आंगले ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT