कोकण

रत्नदुर्ग किल्ल्यावर पुन्हा आढळले मंकलाचे अवशेष

CD

रत्नदुर्ग किल्ल्यावर पुन्हा आढळले मंकलाचे अवशेष
स्नेहल बने यांचा अभ्यास ; धातूमध्ये नक्षीकाम केलेला पट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः येथील रत्नदुर्ग किल्ला परिसरात पुन्हा एकदा नव्याने प्राचीन पटखेळ मंकलाचे अवशेष आढळून आले आहेत. इतिहास अभ्यासक स्नेहल बने या मागील काही महिन्यांपासून रत्नदुर्ग किल्ला परिसराचा अभ्यास करत आहेत. या आधी त्यांना या खेळाचे अवशेष दिसून आले होते. आता पुन्हा नव्याने प्राचीन बैठे म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंकलाचे अवशेष त्यांना दिसून आले आहेत. रत्नदुर्ग संशोधनात हा शोध महत्वाचा असल्याचे बने यांनी सांगितले.
रत्नदुर्ग किल्ल्याचे तीन प्रमुख भाग आहेत. पहिला महादरवाजा, दुसरा दीपगृह परिसर व तिसरा भगवती मंदिर किल्ल्यावरील हनुमान मंदिराशेजारी या प्राचीन पटखेळाचे अवशेष मिळाले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा २४ पटांचा मंकला हा उभ्या रांगेत १२ पट आणि आडव्या रांगेत बारापट तसेच दुसऱ्या ठिकाणी १२ पटांचे आणखी दोन मंकला असे तीन मंकला पटखेळ १ मे रोजी आढळून आले. मंकला हा खेळ विशेषतः आफ्रिकेत खूप प्रचलित आहे. दक्षिण आफ्रिकेत हा खेळ बाव या नावाने प्रसिद्ध आहे. जगभरात हा खेळ खेळला जात होता. या खेळाचे सुमारे साडेतीन हजार वर्षापूर्वीचे संदर्भ आणि अवशेष इजिप्तमध्ये लुकजर कारनक या वास्तूमध्ये या खेळाचे अवशेष पाहायला मिळतात. स्थलांतराने याचा प्रसार आफ्रिकेपासून मध्य आशिया व दक्षिण आशियात झाला.
बाराव्या शतकात या खेळाचे दोनशे प्रकार अस्तित्वात होते. आफ्रिकन लोक व्यापार व दळणवळणाच्यानिमित्ताने समुद्र आणि पठारीमार्गाने ज्या ठिकाणावरून गेले त्या ठिकाणी त्यांनी या खेळाचा प्रसार केला. भारतातील वेगवेगळ्या राज्यात या खेळाची वेगवेगळी नावे आहेत. जसे की, अलीगुली माने, चिने माने, हरलुमाने, पिचकी माने, गोटू गुणी, पलंगुजी ही काही दक्षिणेतील तर सातगोल, सातगोटी, गोगलगाय ही या खेळाची काही मराठी व हिंदी नावे गुरूपल्याण हे या खेळाचे कोकणी नाव आहे. रायगडसह कोकण विभागतही या खेळाचे अनेक ठिकाणी अवशेष सापडले आहेत. मंकला हा खेळ एका आयताकृती फळीवर समोरासमोर पाच, सहा, सात खड्डे कोरलेल्या अशा पटावर खेळला जातो. प्रत्येक पटाच्या रकान्यात पाच कवड्या असतात. हा खेळ काही प्रतिष्ठित लोकांकडे धातूमध्ये नक्षीकाम करून बनवलेला असे. खेळामध्ये सोंगट्या म्हणून कवड्या, रंगीत दगड, कडधान्य, बिया अगदी रत्नदेखील वापरली जात.
----
राष्ट्रीय बैठे खेळ
बऱ्याच लेण्यांमध्ये अनेक प्रकारचे बैठेखेळांचे कोरीव प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये मंकलाचे अवशेष अधिक सापडतात. दक्षिण आफ्रिकेचा तर हा राष्ट्रीय बैठेखेळ आहे. वारी, मॅकोन, सोरो अशी काही विदेशी नावेदेखील वेगवेगळ्या देशात प्रसिद्ध आहेत, अशी माहिती स्नेहल बने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT